शिवभोजन थाळी वितरणात 'हा' जिल्हा आघाडीवर! वितरणातून भागतेय गरिबांची भूक 

shivbhojan thali.jpg
shivbhojan thali.jpg

नाशिक रोड : स्वस्त दरात गरजूंना भोजन मिळावे, यासाठी शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून राज्यभरात सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात गरजूंना सात्त्विक व पोटभर जेवण मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. उत्तर महाराष्ट्रात आजपर्यंत दररोज १६ हजार ५२५ थाळ्या वितरित होत असून, विभागातील १३३ केंद्रांमधून गरिबांची भूक भागविली जात आहे. 

साडेसोळा हजार थाळ्या वितरणातून गरिबांची भागतेय भूक 
लॉकडाउनच्या काळात गरीब, गरजू फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांना शिवभोजन थाळी वरदान ठरली. सुरवातीला दहा रुपये आणि लॉकडाउनदरम्यान पाच रुपयांत ही थाळी वितरित करण्यात येत आहे. 
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुगाणालय, तालुका बसस्थानक, रेल्वे परिसर, महापालिका परिसरात भोजनालय सुरू करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमधील सर्वाधिक शिवभोजन थाळ्या नाशिक जिल्ह्यात वितरित करण्यात येत असून, त्यानंतर जळगाव, नगर, धुळे व नंदुरबार या ठिकाणी वितरित करण्यात येत आहेत. शिवभोजन थाळ्यांची केंद्रे वाढवायला हवीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

विभागाची स्थिती (कंसात केंद्रे) 
नाशिक जिल्हा ः ६९०० (४४) 
नगर जिल्हा ः ३२०० (२४) 
जळगाव जिल्हा ः ३४२५ (३८) 
धुळे जिल्हा ः १५०० (१५) 
नंदुरबार जिल्हा ः १५०० (१२) 
------------------------- 
एकूण ः १६ हजार ५२५ (१३३)  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com