बालकांचे अश्‍लील व्हिडिओ केले व्हायरल...पोलिसांच्या सायबर पेट्रोलिंगमुळे झाला खुलासा

child crime.jpg
child crime.jpg

नाशिक : प्रवीणने मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवरून बालकांचे अश्‍लील व्हिडिओ स्वत:च्या फेसबुक या सोशल मीडियाच्या प्रोफाइलवरून व्हायरल केले होते. त्यानंतर...

काय घडले नेमके?

लहान मुलांचे अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक सायबर पोलिसांनी प्रवीण अहिरे (रा. लक्ष्मण टाउनशिप, डीजीपीनगर, कामटवाडा) या संशयिताला अटक केली. संशयित प्रवीण अहिरे याने मेमध्ये मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवरून बालकांचे अश्‍लील व्हिडिओ स्वत:च्या फेसबुक या सोशल मीडियाच्या प्रोफाइलवरून व्हायरल केले होते. त्यासंदर्भात नाशिक सायबर पोलिसांकडून सातत्याने सायबर पेट्रोलिंग सुरू असताना ही बाब निदर्शनास आली. त्यानुसार, सायबर पोलिसांकडून तांत्रिकदृष्ट्या तपास करण्यात आला व संशयितास अटक करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com