esakal | देशांतर्गत मागणीमुळे कांद्याचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत; पाकच्या कमी भावामुळे अरब राष्ट्रांच्या निर्यातीवर मर्यादा 
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg

अरब राष्ट्रांमधील कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. 
सद्यःस्थितीत नाशिकच्या कांद्याच्या निर्यातीसाठी श्रीलंका, सिंगापूर, मलेशियावर मदार राहिली आहे. मात्र पंधरा दिवसांतील पाकिस्तानच्या कांद्यामुळे याही राष्ट्रांमधील मागणी ३० टक्क्यांपर्यंत आहे. अशा स्थितीत देशांतर्गत घरगुती वापरासाठी मागणी वाढली आहे.

देशांतर्गत मागणीमुळे कांद्याचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत; पाकच्या कमी भावामुळे अरब राष्ट्रांच्या निर्यातीवर मर्यादा 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मकरसंक्रांतीमुळे उत्तर भारतात वाढलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी पावसामुळे हरियाना, राजस्थान, दिल्लीचे व्यापारी नाशिककडे वळले आहेत. त्यामुळे कांद्याच्या आगारातील बाजारपेठांमधून नवीन लाल कांद्याचा सरासरी भाव अडीच हजारांपर्यंत पोचला आहे.

नाशिकच्या नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळत राहील

निर्यातबंदी उठवण्यात आल्याने मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली असताना व पाकिस्तानच्या कांद्याचा भाव टनाला ३०० ते ३५० डॉलरपर्यंत असताना भाववाढीमुळे नाशिकच्या कांद्याचा भाव टनाला ५०० ते ५२० डॉलरपर्यंत पोचला आहे. त्यास कंटेनरचे दुप्पट भावही कारणीभूत आहेत. परिणामी, अरब राष्ट्रांमधील कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. 
सद्यःस्थितीत नाशिकच्या कांद्याच्या निर्यातीसाठी श्रीलंका, सिंगापूर, मलेशियावर मदार राहिली आहे. मात्र पंधरा दिवसांतील पाकिस्तानच्या कांद्यामुळे याही राष्ट्रांमधील मागणी ३० टक्क्यांपर्यंत आहे. अशा स्थितीत देशांतर्गत घरगुती वापरासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आणखी आठवडाभर नाशिकच्या नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळत राहील, असा अंदाज व्यापारी, निर्यातदारांचा आहे.

भारतीय कांद्याला अरब राष्ट्रांमधून पसंती

अरब राष्ट्रांमध्ये पाकचा कांदा दोन दिवसांमध्ये पोचतो. नाशिकच्या कांद्याला पाच दिवस लागतात. श्रीलंकेला मात्र दोन दिवसांमध्ये तुतीकोरीन बंदरातून कांदा पोचत आहे. सिंगापूर, मलेशियासाठी मुंबईच्या बंदरातून आठवडाभरात भारतीय कांदा जातो. पाकच्या कांद्याला दोन आठवडे लागतात. मुळातच, पाकच्या तुलनेत टनाला १०० डॉलरचा अधिकचा भाव असला, तरीही भारतीय कांद्याला अरब राष्ट्रांमधून पसंती मिळते. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

जागेवर किलोला १५ रुपयांचा फरक 
पाकच्या तुलनेत नाशिकच्या कांद्याचा भाव किलोला १५ रुपयांनी अधिक होत आहे. खरेदी आणि पॅकिंगसाठी नाशिकच्या कांद्याचा किलोचा खर्च ३२ ते ३५ रुपयांपर्यंत पोचत आहे. शिवाय किलोला भाडे सहा ते सात रुपये द्यावे लागते. पूर्वी हेच भाडे तीन ते साडेतीन रुपये असायचे. कंटेनरची उपलब्धता मंदावल्याने भाड्याची ही स्थिती तयार झाली आहे. लंडनसाठी एका कंटेनरला साडेतीन हजार, सिंगापूर-मलेशियासाठी अडीच हजार, तर श्रीलंकेसाठी दोन हजार डॉलर मोजावे लागत असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली. दरम्यान, आज क्विंटलला सरासरी मुंबईमध्ये दोन हजार ९५०, नगरमध्ये दोन हजार ५५०, धुळ्यात अडीच हजार, नागपूरमध्ये दोन हजार ६५० रुपये असा भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड

नवीन लाल कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ सोमवार (ता. ४) गेल्या आठवड्याखेरीचा 
येवला २ हजार ४५० २ हजार 
लासलगाव २ हजार ५०० २ हजार ३५० 
मुंगसे २ हजार २५० २ हजार २०५ 
चांदवड २ हजार ५५० २ हजार ३०० 
देवळा २ हजार ६५० २ हजार ६०० 
पिंपळगाव बसवंत २ हजार ५०० २ हजार ३७१