पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाधा नाशिकच्या रेशन पुरवठ्याला

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 6 November 2020

पंजाब राज्यात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्याचा परिणाम गहू, साखर, डाळ पुरवठ्यावर झाला आहे. नाशिक शहरातील २३० दुकानांचा पुरवठा कमी झाला असून, गुदामात माल नसल्याने दुकानांमध्ये जाऊ शकत नाही.​

नाशिक रोड : पंजाब राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या रेशन पुरवठ्याला झळ पोचली आहे. त्यातच नाशिक शहरातील २३० दुकानांचा पुरवठा कमी झाला असून, गुदामात माल नसल्याने दुकानांमध्ये जाऊ शकत नाही. दिवाळीच्या आत हा रेशनचा माल दुकानांपर्यंत पोचवणे पुरवठा विभागासमोर एक आव्हान आहे. 

पंजाब येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाधा नाशिकच्या रेशन पुरवठ्याला
पंजाब राज्यात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्याचा परिणाम गहू, साखर, डाळ पुरवठ्यावर झाला आहे. महिन्याला अंदाजे २१ हजार टन मालाचा नाशिक शहराला पुरवठा होतो. नाशिक शहरात २३० स्वस्त धान्य दुकान परवानाधारक आहेत. या दुकानांमधून लोकांना मोफत व कमी किमतीत मालाचा पुरवठा होतो. मोलमजुरी करणारे हातावरच्या लोकांना हे स्वस्त धान्य दुकाने म्हणजे एक जीवनवहिनीच आहे. प्रत्येक वेळी ‘एफसीआय’ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नाशिक रोड येथे माल येत असतो. आता हा माल मनमाड येथील गुदामात आला असून, तो दुकानदारांपर्यंत पोचण्याचे एक मोठे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे. दिवाळी पुढील आठवड्यात असून, या मालाचा पुरवठा व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींसह दुकानदारही पुरवठा विभागाकडे तगादा लावत आहेत.  

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab farmers agitation effect ration supply to Nashik marathi news