esakal | थरारक.."बाईक साईड मे ले..वरना.." धमकी देत मालेगावच्या मुजाहीदने हवेत झाडली गोळी
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon golibar.jpg

"येडे चाळे करेंगे तो मार डालुंगा' अशी धमकी देत संशयितांनी दोघांना मारहाण केली. तसेच पिस्तूलमधील एक गोळी हवेत झाडली. या प्रकारानंतर संशयित फरारी झाले. अन् मग...

थरारक.."बाईक साईड मे ले..वरना.." धमकी देत मालेगावच्या मुजाहीदने हवेत झाडली गोळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : "येडे चाळे करेंगे तो मार डालुंगा' अशी धमकी देत संशयितांनी दोघांना मारहाण केली. तसेच पिस्तूलमधील एक गोळी हवेत झाडली. या प्रकारानंतर संशयित फरारी झाले. नेमके काय घडले??

असा घडला प्रकार

मोहंमद रजा ऊर्फ शेरा रिक्षाने जात असताना कमर हमीद यांनी रिक्षाला जाण्यासाठी त्यांची मोटारसायकल बाजूला घेतली नाही. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. शेराने कमर हमीदला मारहाण केली. यानंतर त्याने त्याचे साथीदार जे. के., जावेद, नफीस, आसिफ (पूर्ण नाव माहीत नाहीत), रइस अहमद मोहंमद युसूफ, मुजाहिद अहमद रइस अहमद यांना बोलावून घेतले. मुजाहिदने त्याच्याजवळील पिस्तूलने कमर हमीद व त्याच्या भावास धाक दाखविला. "येडे चाळे करेंगे तो मार डालुंगा' अशी धमकी देत संशयितांनी दोघांना मारहाण केली. तसेच पिस्तूलमधील एक गोळी हवेत झाडली. या प्रकारानंतर संशयित फरारी झाले. अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज आगे, पोलिस नाईक सोमनाथ ह्याळीज व पथकाने तपास सुरू केला. संशयित मोटारसायकलने धुळ्याकडे पळाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार धुळे येथील आझादनगर भागात छापा टाकून पथकाने शेरा, रइस अहमद व मुजाहिद अहमद या तिघांना अटक केली. त्यांच्याजवळून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. अवघ्या काही तासांत संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

येथील रमजानपुरा भागात मोटारसायकल बाजूला घेतली नाही म्हणून कमर हमीद शब्बीर अहमद (30, रा. हनीफनगर) याला मोहंमद रजा रइस अहमद ऊर्फ शेरा याने मारहाण केली. या वादाचा वचपा काढण्यासाठी शेराने त्याच्या अन्य साथीदारांना बोलाविले. यातील मुजाहीद अहमद रइस अहमद याने कमर हमीद व त्यांचा भाऊ लतीफ यांना पिस्तूलचा धाक दाखवला. तसेच एक गोळी हवेत झाडली. रमजानपुरा पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 5) रात्री उशिरा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तिघांना धुळे येथून अटक केली. 

हेही वाचा >  "आता मुख्यालयीच थांबा.. अन्यथा.." सरकारी बाबूंकडुनच नागरिकांना भीती