धक्कादायक! फेसबुकवर महिला डॉक्टरची ओळख वेगळीच..अन् सत्यात मात्र...

woman doctor 1.jpg
woman doctor 1.jpg

नाशिक : बनावट जाहिरातीकडून लोकांची फसवणूक व्हावी या हेतूने संशयित डॉ. जोशी हिने तिच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला जाहिरात ठेवली. संबंधित नावाने स्वाक्षरीचे पत्र व त्यावर आवक-जावकचे बनावट शिक्के मारून जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे भासविले. 

अशी करायची 'ती' फसवणूक

रोहित काळे (रा. उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित डॉ. नेहा जोशी हिने फेसबुकवर स्वत:ची ओळख आरोग्य विभागाच्या उपसचिव असल्याचे भासविले. तसेच शासकीय लोकसेवकाचे कोणतेही अधिकार नसताना तिने जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय ग्रामीण अभियानचे आयुक्तांच्या नावे सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या लेटरहेडवर अधिपरिचारीका गट "ब' या पदाची भरती होणार असल्याची जाहिरात सोशल मीडियावर केली. या बनावट जाहिरातीकडून लोकांची फसवणूक व्हावी या हेतूने संशयित डॉ. जोशी हिने तिच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला जाहिरात ठेवली. 13 सप्टेंबर 2019 ला संशयितीने जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य उपसंचालक तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणूक 2019 या नावाने स्वाक्षरीचे पत्र व त्यावर आवक-जावकचे बनावट शिक्के मारून जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला. संशयित महिलेने शासकीय लोकसेवक असल्याचे भासवून फेसबुक प्रोफाइलला राजमुद्रेचा वापर केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

डॉक्‍टर महिलेविरोधात गुन्हा 

आरोग्य उपसंचालक पदावर असल्याचे भासवून, शासकीय लेटरहेडचा वापर करणे व ते व्हायरल करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या डॉक्‍टर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. नेहा मोहन जोशी (रा. चेहेडी पंपिंग, नाशिक रोड) असे संशयित डॉक्‍टर महिलेचे नाव असून, शासकीय लोकसेवकपदावर नसताना तसा वापर करीत फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com