धुळ्यात 89 तलवारी, खंजीर जप्त; पोलिसांच्या सिनेस्टाइल कारवाईत चौघे गजाआड

मुंबई- आग्रा महामार्गावर संशयित स्कॉर्पिओचा सिनेस्टाइल पाठलाग करत पोलिसांनी वाहनासह ८९ तलवारी व खंजीर जप्त केला.
Dhule crime news
Dhule crime newsesakal

धुळे/सोनगीर : मुंबई- आग्रा महामार्गावर संशयित स्कॉर्पिओचा दोन किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करत सोनगीरच्या (ता. धुळे) पोलिस पथकाने आज सकाळी वाहनासह ८९ तलवारी व खंजीर जप्त केला. या प्रकरणी जालना येथील चौघांना गजाआड केले. (89 swords, daggers seized in Dhule)

सोनगीर पोलिस ठाण्याचे गस्ती पथक बुधवारी (ता.२७) सकाळी साडेसातला मुंबई- आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्याजवळ होते. तेव्हा शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणारी भरधाव स्कॉर्पिओ (एमएच ०९ सीएम ००१५) दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्कॉर्पिओचा पाठलाग केला. वाहन थांबविण्याचा चालकाला इशारा दिला. मात्र, चालकाने प्रतिसाद दिला नाही. सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सोनगीर फाट्याजवळ स्कॉर्पिओला ओव्हरटेक करून थांबविले. त्यात चौघे जण होते. विचारपूस करताना चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. स्कॉर्पिओची तपासणी केली असता तीत तब्बल ८९ तलवारी आणि खंजीर आढळला. पोलिसांनी वाहनासह सात लाख १३ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Dhule crime news
जळगाव : पैसे दिले नाहीत म्हणून जावयाने सासूला झोडपले

या प्रकरणी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफीक (वय ३५), शेख इलियाज शेख लतीफ (वय ३२, दोघे रा. सिद्धार्थनगर, वैशाली किराणाजवळ, जालना), सय्यद नईम, सय्यद रहीम (वय २९, रा. सुंदरनगर, एसटी वर्कशॉपमागे जालना), कपिल विष्णू दाभाडे (वय ३५, रा. पंचशीलनगर, बुद्ध विहारजवळ, जालना) या संशयितांना अटक केली. सोनगीर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, शामराव अहिरे, ईश्‍वर सोनवणे, सूरज साळवे आदींनी ही कारवाई केली.

Dhule crime news
गँगवारच्या वाटेवरील 'जळगावात' गोळीबार?

चितोडगड येथून शस्त्रे आणली

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की अटकेतील चौघा संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी प्राणघातक शस्त्रे चितोडगड (राजस्थान) येथून आणल्याची कबुली दिली. ही शस्त्रे जालना येथे नेत असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणण्यामागील त्यांचा उद्देश काय, यामागील मास्टरमाइंड कोण, आणखी कुणी सहभागी आहेत का, घातपाताचा काही प्लॅन होता का आदी प्रश्‍नांची तपासातून उकल केली जात आहे. आम्ही जालना पोलिसांच्या संपर्कात आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com