Dhule News : शेकोटीवर रंगताहेत कापसाच्या अन् विवाहाच्या गप्पा

Bonfire News
Bonfire Newsesakal

कापडणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. पारा पाच अंशांवर आला आहे. थंडीमुळे विविध कामांवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र रब्बीसाठी ही थंडी मोठी फायदेशीर ठरत आहे.

गहू, हरभरा व दादरसाठी वातावरण खूपच पोषक ठरत आहे. पिकांची वाढ जोमाने होत आहे. दुसरीकडे आबालवृद्ध थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. शेकोटीभोवती कापसाचा भाव, राजकारणासह विवाहाच्याही गप्पा रंगत आहेत. (Around the fireplace they gossip about cotton prices and politics and marriage topics dhule News)

Bonfire News
Municipal Corporation News : दरमहा सहा लाख खर्च, शौचालय साफसफाईची बोंबाबोब

थंडीचे वातावरण आरोग्यासाठी पोषक असते. सध्या नियमितसह इतर हौशी मंडळी पहाटेच्या व्यायामात रमले आहेत. मात्र तापमानाचा पारा अचानक पाच अंशांवर आल्याने तब्येतीवरही परिणाम जाणवत आहे. सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. वृद्धांच्या तब्येतीवर थंडीचा परिणाम जाणवत आहे.

मुलांच्या विवाहाचे कसे करायचे..!

ज्येष्ठांच्या शेकोटीवर या वर्षी कोणाचे लग्न जमणार, कोण राहून जाईल अशा विषयांवर खमंग चर्चा होत आहे. बिगरनोकरीवाल्या मुलाला मुली द्यायला तयार नाहीत. विवाहाचे वय वाढतेच आहे. त्यांच्या विवाहासाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. त्या पर्यायांवर साऱ्यांचेच एकमत असल्याचे शालिक पाटील यांनी सांगितले.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

कापसाचे भाव वाढतील का?

चौकाचौकांत गप्पा मारणाऱ्यांनी शेकोटीचा आधार घेतला आहे. ऊब मिळवीत गप्पा मारताहेत. यात कापसाच्या भावाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. भाव वाढतीलच, अशा आशादायक गप्पा मारीत आहेत.

नाराज युवा शेतकरी केंद्र सरकारवरही ताशेरे ओढत आहेत. गप्पांमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही चर्चाचर्वित होत आहे.

"थंडी वाढल्याने, रात्री पिकांना पाणी द्यायला जावेसे वाटत नाही. पण पाणी भरावेच लागेल. पहाटे थंडीचा कडाका वाढतो. शेतातच शेकोटी पेटवून काम सुरू ठेवावे लागते. शेतशिवारात रात्रीची वीज असल्याने, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत."

-संदीप पाटील, युवा शेतकरी, कापडणे

Bonfire News
Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com