Nandurbar News : शहाद्यात थकबाकीदारांची वसुली पथकास शिवीगाळ, मारहाण

Beating News
Beating Newsesakal
Updated on

शहादा : शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कर घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम गेल्या दोन वर्षा सुमारे दहा कोटी रुपयांपर्यंत थकीत असल्याने पालिका प्रशासनातर्फे वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरातील गरीब नवाज कॉलनीमध्ये पालिकेचे वसुली पथक थकीत कराची वसुली करण्यासाठी गेले असता थकबाकीदार नागरिकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची घटना घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Arrears recovery team abuse and beaten in Shahdara Nandurbar News)

Beating News
Nashik Corruption News : कुऱ्हेगावच्या दलितवस्ती सुधार योजनेत चौदा लाखांचा भ्रष्टाचार!

शहरातील गरीब नवाज कॉलनी वसुली विभागातील क्लार्क खलिल शेख मुशिर व त्याचे सहकारी संजय जयवंत माळी विलास ठाकरे यांचे पथक लईक शेख शकूर व वसीम शेख सुभान बागवान यांच्या घरी गेले. तुमच्याकडे १२ हजार ०२७ रुपये घरपट्टी ११ हजार ५०० रुपये पाणीपट्टीची कराची रक्कम थकबाकी आहे.

तुम्ही ते त्वरित पालिकेकडे जमा करा अन्यथा तुमच्या घराचे नळ कनेक्शन बंद केले जाईल ही कारवाई टाळण्यासाठी थकीत कराचे रक्कम त्वरित भरावी असे सांगितले. वसीम बागवान व त्याच्या दोन-तीन सहकाऱ्यांनी पालिकेच्या वसुली पथकातील कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम भरून सहकार्य करणे ऐवजी शिवीगाळ करत मारहाण केली.

वसीम याने घरातून तलवार आणत कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे वसुली विभागातील कर्मचारी घाबरले. त्यांनी कुठलीही कारवाई न करता थेट नगरपालिका घाटात मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Beating News
Dhule News : नवा चेहरा कोण ? नाट्यमय घडामोडीनंतर महापौर निवडीकडे धुळेकरांचे लक्ष

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी वसुली विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेत गरीब नवाज कॉलनी परिसरात घडलेल्या प्रकाराबाबत कर निरीक्षक राजेंद्र सैंदाणे यांना वसुली पथकातील कर्मचाऱ्यांसह पोलिस स्टेशन येथे जाऊन पथकावर हल्ला करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. यानंतर पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष खबरदारी बाळगण्याचे सूचना केल्या.

पालिकेतील थकीत करांची रक्कम

शहरातील एकूण मालमत्ता

वाणिज्य- १४९८

निवासी - ९३७३

एकूण -१०८७१

Beating News
Nashik News : कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यानच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या रद्द; जाणुन घ्या गाड्यांची स्थिती

पाणीपट्टीची थकबाकी मागील वर्षाची २ कोटी ८ लाख रुपये चालू वर्षाची एक कोटी ५० लाख एकूण ३ कोटी ५९ लाख रुपये घरपट्टीची थकबाकी मागील वर्षाची चार कोटी ५३ लाख ७ हजार ९११ चालू वर्षाचे तीन कोटी ४८ लाख ७७ हजार ३७९ एकूण सात कोटी ५४लाख १५ हजार २७९रुपये "नागरिकांकडे असलेल्या थकीत कराची रक्कम त्यांनी त्वरित पालिका प्रशासनाकडे जमा करून आर्थिक दंडात्मक कारवाई टाळावी.वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. कराची रक्कम भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वसुली विभागातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जाईल." -दिनेश सिनारे, मुख्याधिकारी, शहादा पालिका

Beating News
SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com