Ashadhi Ekadashi Bakri Eid : नंदुरबार जिल्ह्यात आषाढी एकादशी, बकरी ईद उत्साहात; एकतेचे दर्शन

Ashadhi Ekadashi Bakri Eid in excitement in Nandurbar news
Ashadhi Ekadashi Bakri Eid in excitement in Nandurbar newsesakal

Ashadhi Ekadashi Bakri Eid : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २९) आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन सण एकाच दिवशी साजरे झाले.

मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देता ईद साजरी केली. पोलिस प्रशासनाचा आवाहनाला साथ देत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले. (Ashadhi Ekadashi Bakri Eid in excitement in Nandurbar news)

आषाढी एकादशी म्हणजे हिंदू भाविकांचा उपवास असतो, विठ्ठल-रुखमाईस साकडे घालतात. या भावना लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मोहल्ला कमिटीच्या बैठका घेऊन मुस्लिम बांधवांना गुरुवारी कुर्बानी न देता ती दुसऱ्या दिवशी देण्याचे आवाहन केले होते. जिल्हाभर हा उपक्रम राबविला.

त्याला मुस्लिम बांधवांनी साद घातली. आषाढी एकादशीमुळे गुरुवारी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचे आश्‍वासन दिले. त्यातून दोन्ही धर्मांतील सामाजिक एकतेचे दर्शन घडले. दोन्ही धर्मीयांनी एकमेकांना शुभेच्छा देत आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण साजरा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashadhi Ekadashi Bakri Eid in excitement in Nandurbar news
Bakri Eid 2023: रिमझिम सरीत सामाजिक सलोख्याचे दर्शन! मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद उत्साहात

पोलिस बंदोबस्त, सर्वत्र शांतता

जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन दोन्ही धर्मीयांचे सण-उत्सव एकाच दिवशी आनंदात साजरे करता यावेत, म्हणून शांतता राखण्याचे आवाहन केले होते. तसेच समाजविघातक वृत्तीवर करडी नजर ठेवण्याचेही आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरासह सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही सण-उत्सव अत्यंत आनंदात व उत्साहात साजरे झाले.

विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील घी बाजारातील विठ्ठल मंदिर व पटेलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासून पाऊस सुरू होता. मात्र दुपारी तीननंतर पाऊस बंद झाला होता. मात्र वातावरणात गारठा होता. त्यामुळे सायंकाळी दर्शनासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

Ashadhi Ekadashi Bakri Eid in excitement in Nandurbar news
Ashadhi Ekadashi 2023 : धुळ्यात ‘जय हरी विठ्ठल’चा जयघोष; दर्शनासाठी रीघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com