Ashadhi Ekadashi 2023 : धुळ्यात ‘जय हरी विठ्ठल’चा जयघोष; दर्शनासाठी रीघ

On the occasion of Ashadhi Ekadashi, a crowd gathered at the Shri Vitthal Temple in the Dussehra Maidan area for darshan.
On the occasion of Ashadhi Ekadashi, a crowd gathered at the Shri Vitthal Temple in the Dussehra Maidan area for darshan. esakal

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह वारकरी, आबालवृद्धांचे अराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथील दसेरा मैदान परिसरातील प्रमुख श्री विठ्ठल मंदिरात जय हरी विठ्ठलाचा जयघोष करत भाविकांनी दिवसभर गर्दी केली.

भरपावसातही दर्शन घेताना पोलिसबांधव कर्तव्य बजावत होते. मंदिर परिसरातील यात्रोत्सवातही गर्दी उसळली होती. (ashadhi ekadashi 2023 celebration dhule news)

पाळण्यांसह मनोरंजनाची साधने, विविध विक्रेत्यांसाठी हा दिवस रोजगाराची पर्वणी ठरला. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली.

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी माउली...माउली आणि जय हरी विठ्ठलाच्या अखंड जयघोषात गुरुवारी (ता. २९) आषाढी एकादशी साजरी झाली. येथील श्रीविठ्ठल मंदिरात भाविकांनी नतमस्तक होत विठुरायाचे दर्शन घेतले. सकाळी सहानंतर पावसाची रिपरिप सुरू असतानाही भाविकांनी दसेरा मैदान परिसरातील प्राचीन श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. पाऊस थांबल्यावर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

मनोभावे दर्शन

शहरात ठिकठिकाणी असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरात सकाळी महापूजा झाली. भजन-कीर्तन, महाप्रसादाचे कार्यक्रम झाले. दसेरा मैदान परिसरातील प्राचीन श्रीविठ्ठल मंदिरातील मूर्ती आकर्षक फुलांनी सजविण्यात आली. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

On the occasion of Ashadhi Ekadashi, a crowd gathered at the Shri Vitthal Temple in the Dussehra Maidan area for darshan.
Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त 80 टन रताळ्यांची विक्री! 3 टन भुईमूग शेंगाचीही विक्री

सकाळपासून भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली. पावसाची रिपरिप असली, तरी भाविकांचा उत्साह कमी दिसत नव्हता. दुपारी पाऊस बंद झाल्यानंतर भाविकांची दर्शनासह यात्रोत्सवात गर्दी उसळली. भाविकांनी जय हरी विठ्ठल, माउली...माउली...असा गजर करीत विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर आवारात अनेकांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही. भाविकांना साबूदाणा खिचडी, केळी या प्रसादाचे वाटप झाले.

भरपावसात बंदोबस्त

पावसातही पोलिस कर्मचारी सकाळपासून कर्तव्यावर होते. शहर वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी संगीता राऊत लक्ष ठेवून होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांनी नियोजनावर भर दिला. पावसाची तमा न बाळगता रेनकोट, टोपीविना पोलिसांनी कर्तव्य निभावले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी शांततेकामी नियोजनात सहभाग नोंदविला.

On the occasion of Ashadhi Ekadashi, a crowd gathered at the Shri Vitthal Temple in the Dussehra Maidan area for darshan.
Ashadhi Wari 2023: वेढा वेढा रे पंढरी! मोर्चे लावा भीमातिरी! वाखरीत दिंड्या विसावल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com