Dhule : व्यापाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न

Dhule crime News
Dhule crime News esakal

शिरपूर (जि. धुळे) : दुकानावरील ग्राहक वळविल्याच्या वादातून युवक व्यापाऱ्याच्या पोटात धान्य उपसण्याचा लोखंडी बंब खुपसून ठार करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना सोमवारी (ता.१३) येथील बाजार समितीमध्ये घडली. संशयितांपैकी बापाला दोन दिवसांची पोलिस कोठडी (custody) तर त्याचा मुलगा फरारी आहे. दोन्ही संशयित बाप- लेकही व्यापारी आहेत. (Attempt of murder of merchant by merchant Dhule Crime News)

येथील बाजार समितीमध्ये धान्य आडतीची दुकाने आहेत. तेथे विजयकुमार गुलाबचंद जैन यांच्या मालकीचे धन्ना ट्रेडर्स दुकान आहे. तेथे धान्याच्या किरकोळ व ठोक खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. त्याच परिसरात आबा देवरे यांचेही आडत दुकान आहे. १३ जूनला दुपारी दीडला देवरे यांच्या दुकानावर आलेला ग्राहक धन्ना ट्रेडर्सवर गेला. त्याला फितवून नेल्याच्या संशयावरून आबा देवरे व नंदकिशोर देवरे या बापलेकांनी धन्ना ट्रेडर्सवर बसलेला नवनीत जैन याच्याशी वाद घातला. वाद वाढत जाऊन दोघांनी नवनीतला मारहाण केली. संशयित नंदकिशोर याने काऊंटरवर चढून पोत्यातून धान्याचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार बंब हातात घेत नवनीतच्या पोटात खुपसला.

Dhule crime News
पारोळा शाळेत वही पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

रक्तबंबाळ होऊन नवनीत जमिनीवर कोसळला. परिसरातील व्यापाऱ्यांनी दोघांच्या तावडीतून त्याची सुटका केली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. विजयकुमार जैन यांच्या फिर्यादीवरून संशयित देवरे पितापुत्रांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आबा देवरे याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१४) शिरपूर न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

Dhule crime News
Jalgaon : पाटणा परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com