बंबच्या लॉकरमध्ये सापडले मोठे घबाड

अवैध सावकारी प्रकरणी येथील एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्या एका बँक लॉकरच्या झाडाझडतीतही पोलिसांना मोठे घबाड आढळून आले.
Fraud
Fraudesakal

धुळे : अवैध सावकारी प्रकरणी येथील एलआयसी एजंट (LIC agent) राजेंद्र बंब याच्या एका बँक लॉकरच्या झाडाझडतीतही पोलिसांना मोठे घबाड आढळून आले. बंब याच्या या लॉकरमधून पोलिसांनी तब्बल अडीच कोटींवर रोकड व १९ लाखांवर सोन्याचे दागिने, असा एकूण दोन कोटी ७३ लाखांवर मुद्देमाल जप्त केला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पहिल्याच दिवशी बंबच्या घरात सव्वा कोटीवर कॅश व ४६ लाखांचे सोने सापडले होते. (Black money)

स्वतःकडे नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यालाच अवैध सावकारी पाशात अडकविणाऱ्या बंब याला बुधवारी (ता. १) जिल्हा न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, बुधवारी (ता. १) त्याच्यासह त्याच्या भावाकडे पोलिसांच्या पाच पथकांनी छापा घातला होता. यातून मोठे घबाड व कागदपत्र पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २) पोलिसांसह सहाय्यक निबंधक तथा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी संयुक्तपणे दि जळगाव पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक लि. शाखा धुळे येथे बंब व त्याची पत्नी सोनल राजेंद्र बंब यांच्या लॉकरची झाडाझडती घेतली. त्यात तब्बल दोन कोटी ५४ लाख ८८ हजार ५०० रुपयांची रोकड व १९ लाख, पाच हजार १०० रुपयांचे सोन्याचे ४४०.७०० ग्रॅम दागिने आढळून आले. पथकाने असे एकूण दोन कोटी ७३ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळून आलेली रक्‍कम व सोन्याचे दागिने गुन्ह्याशी संबंधित असल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आले. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, सहाय्यक निरीक्षक हिरालाल ठाकरे, उपनिरीक्षक हर्षवबर्धन बहीर, हवालदार गयासुद्यीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर तसेच सहाय्यक निबंधक तथा उपनिबंधक मनोज चौधरी, सहकार अधिकारी राजेंद्र वीरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Fraud
ऑनलाइन व्यवसायाचे आमिष महागात; रक्कम बँकेत जमा होताच मारला डल्ला

छापासत्र अजून बाकी

दरम्यान, पुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील. बंबच्या शिरपूर पीपल्स बॅंक, योगेश्‍वरी पतपेढीत झडती घेणे बाकी असल्याचे पोलिस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले. दरम्यान, राजेंद्र बंब याने कोणा कर्जदाराच्या मालमत्तेचे कागदपत्र गहाण अगर सौदा पावती करून ठेवून घेतली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

Fraud
करिअरच्या वाटेवर... : ‘न्याय’ मिळवून देणारे करिअर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com