Life imprisonment News : सेल्फीच्या पुराव्यामुळे प्रियकराला जन्मठेप; तरूणीच्या खूनाचे प्रकरण

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangaresakal

Dhule News : विवाहास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून केला. ही थरारक घटना शिरपूर येथे घडली होती. खून करण्यापूर्वी प्रियकराने तरूणीसोबत घेतलेला सेल्फी आणि खून केल्यानंतर मोबाईलमध्ये काढलेले तिचे रक्ताच्या थारोळ्यातील छायाचित्र माथेफिरू प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावणीसाठी पुरेसे ठरले.

याबाबत जिल्हा सरकारी वकिल ॲड. देवेंद्रसिंह तवर यांनी प्रभावीपणे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानत येथील जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांनी जन्मठेपेच्या शिक्षेबाबत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. (case of murder of young girl in Shirpur for refusing marriage Because of selfie evidence Life imprisonment for lover Dhule News )

रेणुका धनगर हिचा विवाह २३ मार्च २०१९ ला झाला. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जातोडा (ता. शिरपूर) येथे आली. ती २५ मार्चला सकाळी आठला चहा पिण्यासाठी गावातच जाते, असे सांगून घरातून निघाली. तिचा मोबाईल ती घरीच विसरली.

असे असताना प्रियकर नरेंद्र एकनाथ भदाणे ऊर्फ पप्पू शेटे (रा. शिरपूर) याने रेणुका हिला जातोडा येथून शिरपूर शहरात बोलाविले. तिला २५ मार्च २०१९ ला मोटारसायकलवर तो संगीता लॉजवर सकाळी पावणेदहाला घेऊन गेला.

नंतर पप्पू शेटे याने रुम नंबर १०९ मध्ये रेणुकाचा चाकूने गळा चिरून खून केला. या घटनेनंतर रेणुकाच्या मोबाईलवर सकाळी साडेअकराला संपर्क करत पप्पू शेटे याने ‘मी पप्पू शेटे बोलत आहे, तू रेणुकानी माय शे का... मी रेणुकाले मारी टाक’ असे रेणुकाच्या आईला सांगितले.

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
Farmer News : शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण; राधाकृष्ण विखे पाटील

खूनाच्या तपासाला गती

या पार्श्‍वभूमीवर आई- वडिलांनी रेणुकाचा तपास सुरू केला. तेव्हा शिरपूर येथील संगीता लॉजमधील रुम नंबर १०९ मध्ये रेणुका मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरपूर शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला.

त्यावेळचे तपास अधिकारी तथा शिरपूरचे पोलिस निरीक्षक शिवाजी ए. बुधवंत यांनी तपासाला गती देत आरोपी पप्पू शेटे हा संगीता लॉजमध्ये रेणुकासोबत जाताना पाहणारे प्रत्यक्ष साक्षीदार केल्याबाई पावरा, लॉजचा मालक पवन शिंदे, लॉजच्या शेजारील मॅकेनिक महेंद्र गिरासे यांचे जबाब नोंदविले.

तसेच, तपासासाठी नरेंद्र ऊर्फ पप्पू शेटे याचा मोबाईल (स्मार्ट फोन) जप्त केला. त्या मोबाईलमध्ये आरोपी शेटेने खून करण्यापूर्वी रेणुकाबरोबर घेतलेला सेल्फी आणि खून केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यातील रेणुकाचा फोटो काढल्याचे लक्षात आले.

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार स्क्रीन शेअर, नवीन फीचरची चाचणी सुरू

‘लास्ट सीन टूगेदर’

तपासादरम्यान आरोपी शेटेचा मोबाईल फॉरेन्सीक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला. तसेच, त्याचा रक्‍ताचा डाग असलेला शर्ट जप्तीसह तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले.

आरोप निश्‍चितीनंतर खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांच्यापुढे सुरू झाली. खटला हा न्यायालयीन भाषेत ‘लास्ट सीन टूगेदर’ या संज्ञेवर म्हणजेच मृत्यूपूर्वी प्रियसी व प्रियकराला एकत्रितपणे पाहणाऱ्या साक्षीदारांवर अवलंबून होता.

सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी फिर्यादी मिनाबाई मोतीलाल धनगर, घटनास्थळाचे पंच, डॉक्टर, टेक्नेशियन, फोटोग्राफर, मोबाईल तज्ज्ञ तथा न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि इतर असे मिळून एकूण दहा साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
Agriculture News : भाताची 29 हजार हेक्टरवर होणार लागवड; खते, बियाण्यांच्या उपलब्धतेची तयारी

साक्षीदार फितूर, पण...

खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारीत होता. तो सुरु होण्यापूर्वी महत्त्वाच्या साक्षीदार केल्याबाई हिचे कोरोना महामारीत निधन झाले. तसेच पवन शिंदे, महेंद्र गिरासे हे साक्षीदार फितूर झाले होते.

परंतु, पवन शिंदे याचा उलट तपास जिल्हा सरकारी वकील ॲड. तवर यांनी घेतल्यावर आरोपी शेटे हा रेणुकाबरोबर संगीता लॉजवर आला होता, त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही व्यक्‍ती आलेला नव्हता हे सिद्ध झाले.

न्यायवैद्यक तज्ज्ञ गौरव वायल यांनी आरोपी शेटेच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी पप्पू शेटे व रेणुकाचा सेल्फी २५ मार्च २०१९ ला सकाळी ९ वाजून ५१ मिनिटे ३७ सेकंदाला काढला होता. तर रक्ताच्या थारोळ्यातील रेणुकाचा फोटो ११ वाजून १९ मिनीट ४१ सेकंदला काढल्याचे सिद्ध केले.

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
Education News : कमी टक्क्यांमुळे बिघडणार प्रवेशाचे गणित ?

‘सायलेंट विटनेस’ ग्राह्य

जिल्हा सरकारी वकिल ॲड. तवर यांनी युक्तीवादात सांगितले, की प्रत्येक घटनेला प्रत्यक्षदर्शी व्यक्ती हा साक्षीदारच हवा असे नाही. बऱ्याच वेळी तांत्रिक पुराव्यानेही ‘लास्ट सीन टूगेदर’ सिद्ध होऊ शकते. आजचे विज्ञानाचे युग असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईलमधील कॅमेरे व यातील मोबाईलचा पुरावा हा ‘सायलेंट विटनेस’ या संज्ञेखाली येतो.

व्यक्ती खोटे बोलू शकतो. परंतु, फोटोमध्ये जे आहे तेच दिसते. सेल्फीतील आरोपी शेटेचा शर्ट व त्याचा तोच रक्ताचे डाग असलेला शर्ट एकच असून, त्याचा खूनाशी संबंध आहे. साक्षीदार मृत अथवा फितूर झाले तरीही मोबाईलमधील सेल्फी व खूनानंतरचा फोटो घटनेपूर्वी दोघेही एकत्र होते हे सिद्ध करते.

हा प्रभावी युक्तीवाद आणि तपासी अधिकारी बुधवंत यांचा सखोल तपास ग्राह्य मानत न्यायालयाने नरेंद्र भदाणे ऊर्फ पप्पू शेटे यास जन्मठेपेची शिक्षा, तसेच दहा हजार द्रव्यदंडाची रक्‍कम भरण्याचा आदेश दिला. ॲड. तवर यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्‍या, ॲड. सोनवणे, ॲड. भोईटे, ॲड. मयुर बैसाणे, ॲड. प्रेम सोनार, एलसीबीचे पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले.

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
Crime news : बहिणीला आक्षेपार्ह मॅसेज करून फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाची भावाकडून हत्या

महिन्यातच तीन जन्मठेपेच्या शिक्षा

धुळे जिल्हा न्यायालयात या महिन्याभरातच जन्मठेपेच्या तीन शिक्षा सुनावण्यात आल्या. जिल्हा सरकारी वकील तवर, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जगदीश सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून राजहंस कॉलनीतील श्रीराव खून खटल्यात आरोपी अजिंक्य मेमाणे, देवपूरमधील हत्तीडोह परिसरातील शिवाजी मोरे खून खटल्यात आरोपी विनोद चव्हाण आणि शिरपूरमधील रेणुका धनगर खून प्रकरणी आरोपी पप्पू शेटे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात ॲड. तवर यांचा प्रभावी युक्तीवाद ग्राह्य मानल्याने हा निकाल देण्यात आला.

Shirpur: Narendra Bhadane and Renuka Dhangar
Crime news : बहिणीला आक्षेपार्ह मॅसेज करून फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाची भावाकडून हत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com