Latest Marathi News | ढगाळ वातावरणाने पिकाची वाढ खुंटेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Crises News

Dhule News : ढगाळ वातावरणाने पिकाची वाढ खुंटेल

धुळे : शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तापमानाचा पारा सरासरी सात अंशांवर आल्याने धुळेकरांना हुडहुडी भरली आहे. तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

परिणामी नागरिकांना दुपारी दोननंतर अधूनमधून सूर्यदर्शन होते आहे. वातावरणातील बदलामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. साहजिकच नागरिकांना दिवसभर उबदार कपडे परिधान करून काम करावे लागत आहे. (Cloudy weather will stunt the growth of crop Dhule News)

हेही वाचा: SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

शहरासह जिल्ह्याच्या तापमानात दोन दिवसांपासून कमालीचा बदल झाला आहे. तापमानाचा पारा सरासरी ७ ते ७.६ अंशांवर आल्याने धुळेकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले.

परिणामी दुपारी दोननंतर नागरिकांना अधूनमधून सूर्यदर्शन होत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम जनजीवनावरदेखील झाला आहे. सकाळी दहापर्यंत शहराच्या बाजारपेठेत नागरिकांचा फारसा वावर दिसत नाही.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik Crime News : वाऱ्यासारखी पसरली बातमी अन् अपहरणकर्त्यांनी घेतली धास्ती; मध्यरात्रीच चिरागची घरवापसी

तसेच काही नागरिक कामानिमित्त बाहेर पडले तर स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून बाहेर पडताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.

वातावरणातील बदलाचा फटका रब्बीतील पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर सूर्यप्रकाश पडत नसल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. तसेच आळी पडण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा कीटकनाशकांची फवारणीवर खर्च होईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Jalgaon News : भुसावळची लूट करणारी टोळी अटकेत; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई