Nandurbar News : नंदुरबार ग्रामीणमधील रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर; आमदार तांबे यांचे सीईओंना पत्र

Nandurbar News : नंदुरबार ग्रामीणमधील रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर; आमदार तांबे यांचे सीईओंना पत्र
esakal

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकांची अवस्था अत्यंत बिकट असून, त्यामुळे रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली.

विशेष म्हणजे आमदार सत्यजित तांबे यांनी याआधीच नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून रुग्णवाहिकांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. (condition of ambulance in Dhadgaon Rural Hospital is very bad nandurbar news)

सरकार ग्रामीण भागांमध्ये रुग्णवाहिका पुरविते, पण या रुग्णवाहिकांचा इंधन व देखभाल-दुरुस्ती खर्च मिळत नसल्याने त्या बंद अवस्थेत पडून असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचेही आमदार तांबे यांनी म्हटले आहे.बऱ्याचदा रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे खूप गरजेचे असते.

रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरू असताना वेळेवर उपचारांसाठी रुग्णालयात पोचणे, म्हणजेच वेळेशी स्पर्धा असते आणि अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. रुग्णवाहिकाच नादुरुस्त असेल, तर मात्र हा नक्कीच रुग्णांच्या जिवाशी खेळ ठरू शकतो, अशी भीती आमदार तांबे यांनी व्यक्त केली.

नंदुरबारसह पाचही जिल्ह्यांना सरकारने रुग्णवाहिका दिल्या होत्या. मात्र यापैकी काही रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत. परिणामी या पाचही जिल्ह्यांतील दुर्गम भागातील रुग्णांच्या वाहतुकीची व्यवस्था कोलमडली आहे.

Nandurbar News : नंदुरबार ग्रामीणमधील रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर; आमदार तांबे यांचे सीईओंना पत्र
Nandurbar Ganeshotsav : वडाळीत डीजे, गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक! एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम

आमदार तांबे यांनी याआधीही १२ मे २०२२ ला तत्कालीन परिवहनमंत्र्यांसह पत्रव्यवहार केला होता. मात्र आता दीड वर्षाने पुन्हा एकदा त्याच विषयावर पत्र लिहिण्याची वेळ आल्याची भावनाही आमदार तांबे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली.

वेळीच सावध व्हा

राज्यात ग्रामीण भागांमध्ये हीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध झाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार सत्यजित तांबे यांनी ३० ऑगस्टला पाचही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या रुग्णवाहिकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सेस निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.0

Nandurbar News : नंदुरबार ग्रामीणमधील रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर; आमदार तांबे यांचे सीईओंना पत्र
Nandurbar Bribe Crime : शहाद्यात 20 हजारांची लाच घेताना अभियंत्याला अटक; लघुपाटबंधारेतील बिलासाठी घेतली रक्कम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com