Leopard Attack in mhasdi Village Of Dhule District
Leopard Attack in mhasdi Village Of Dhule Districtesakal

काकोर शिवारात बिबट्याच्या हल्यात गो-हा फस्त

म्हसदी (जि. धुळे) : येथील चिंचखेडे रस्त्यावरील काकोर शिवारात गुरुवारी (ता. २) पहाटे बिबट्याने गोऱ्हा फस्त केला. दोन-तीन दिवसांपासून रात्री दिसणाऱ्या बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काही दिवसांपासून काकोर आणि चिंचखेडे येथील पाडगण शिवारात बिबट्याचा मुक्त संचार आहे. काकोर शिवारात योगेश देवरे यांच्या शेतात खिल्लार जातीच्या गोऱ्ह्यावर बिबट्याने हल्ला चढवला. शेतकरी योगेश देवरे सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल एस. डी. देवरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

Leopard Attack in mhasdi Village Of Dhule District
बिबट्याशी झुंज देत शेतकऱ्याने वाचवले स्वतःचे प्राण

वन कर्मचाऱ्यांचा घ्यावा लागतोय शोध

वन्यपशूच्या हल्ल्यात पाळीव प्राणी फस्त झाला, तर वन विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात भरपाई दिली जाते. भरपाई मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा प्रवास मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नकोसा होतो. कारण पंचनाम्यासाठी वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलविण्यापासून, तर मृत जनावरांचे विच्छेदन अहवाल मिळविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मात्र दारोदार फिरावे लागते. वनपाल, वनरक्षकच काय वॉचमनही स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने वेळेवर उपलब्ध होत नाही. अशावेळी भ्रमणध्वनीवर संपर्क साधात आपबिती सांगितली जाते. दुसरीकडे येथील वन विभागाच्या परिमंडळ कार्यालयात (बेस्ट टेन्शन) वन कर्मचारी दिवसभर थांबत नाहीत. अशावेळी नुकसानग्रस्त शेतकरी व्यथा कोणाकडे मांडतील, हाच खरा प्रश्न आहे.

Leopard Attack in mhasdi Village Of Dhule District
Nashik : बिबट्याच्या हल्लात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये दहशत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com