Dhule News : पितृपक्षात फूल बाजार रोडावला

demand of flowers decrease
demand of flowers decreaseesakal

Dhule News : गणेशोत्सवाच्या काळात मोठी मागणी असलेल्या सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत पितृपक्षात मोठी घट झाली आहे.

मागणी नसल्याने शहरातील प्रमुख आग्रा रोडवरील फुलवाला चौक, संतोषीमाता चौक, साक्री रोड, देवपूरमधील दत्त मंदिर चौकातील फूल बाजार गेल्या काही दिवसांपासून रोडावला आहे. (demand of flowers decrease in pitru paksha dhule news)

आता घटस्थापनेनंतरच फुलांच्या मागणीत पुन्हा वाढ होऊन बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. धुळे शहरात साक्री, दोंडाईचा, कापडणे, न्याहळोद, धमाणे, देवभाने, नंदाणे, बुरझड, लामकानी, बोरीस, मुकटी, अजंग, नेर व आनंदखेडे परिसरातील फूल शेतीतून फुलांची आवक होते. त्याद्वारे मोठी उलाढालही होते.

सध्या पितृपक्षात कोणत्याच फुलांना मागणी नसल्याने फूल बाजार आकसला आहे. सण-उत्सवाच्या काळात तर फुलवाला चौक, संतोषीमाता चौकात फुलबाजार तेजीत होता. मात्र, सध्या कोणत्याच फुलांना मागणी नसल्याचे विक्रेते सांगतात.

demand of flowers decrease
Nashik Agriculture News: बारागांवपिंप्री येथे भुईमूगात घेतले सूर्यफुलाचे आंतरपीक!

परिसरातील शेतकऱ्यांचा कल अलिकडे झेंडूऐवजी बुकेसाठी लागणाऱ्या गुलछडी, स्टर, कामिनी आदींकडे आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक होते. शेतकऱ्यांकडून इतर फुलांच्या लागवडीस पसंती दिली जात आहे.

आता नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेपासून फुलांच्या आवकेत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे. दसऱ्यानंतर थेट दिवाळीपर्यंत फुलांना मोठी मागणी असेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.

demand of flowers decrease
Dhule Agriculture News : कपाशीवर मिलीबग, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com