Dhule News : समितीच्या बैठकीअभावी १८ पाणीपुरवठा रखडल्या : आमदार कुणाल पाटील

Dhule : जलजीवन मिशन योजनेंतर्गत धुळे तालुक्यातील १८ पाणीपुरवठा योजना राज्यस्तरीय समितीची बैठक होत नसल्याने मंजुरीविना रखडल्या आहेत.
MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal

Dhule News : जलजीवन मिशन योजनेंतर्गत धुळे तालुक्यातील १८ पाणीपुरवठा योजना राज्यस्तरीय समितीची बैठक होत नसल्याने मंजुरीविना रखडल्या आहेत. त्यामुळे तातडीने समितीची बैठक लावण्यात यावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. (Dhule MLA Kunal Patil statement 18 water supply stopped due to lack of committee meeting)

त्यानुसार मंत्री पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना बैठकीचे आदेश दिले, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. धुळे तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत रखडलेल्या १८ पाणीपुरवठा योजनांना गती मिळावी यासाठी आमदार पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री पाटील यांची नुकतीच भेट घेतली.

या वेळी आमदार पाटील यांनी राज्यस्तरीय विभाग समितीची बैठक लावण्याची मागणी मंत्री पाटील यांच्याकडे केली. धुळे तालुक्यातील प्रतीपाडा (नांद्रे), खंडलाय बुद्रुक, वडणे, पुरमेपाडा, बिलाडी, मोरशेवडी, अकलाड, धामणगाव, खंडलाय खुर्द, निमगूळ, सडगाव, नरव्हाळ, न्याहळोद, लोणखेडी, अनकवाडी, कुळथे, मांडळ. (latest marathi news)

MLA Kunal Patil
Dhule News : धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप

सैताळे या गावांतील पाणीपुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या कामांची मान्यता व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, राज्यस्तरीय विभाग समितीची बैठक होत नसल्याने कार्यारंभ आदेश देता येत नाही.

परिणामी या योजना रखडल्या आहेत. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी राज्यस्तरीय विभाग समितीची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी पत्रातून केली.

पत्राची दखल घेत मंत्री श्री. पाटील यांनी राज्यस्तरीय विभाग समितीची त्वरित बैठक घेण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी दिल्या. त्यामुळे आता रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

MLA Kunal Patil
Dhule News : नेर गटासाठी 22 लाखांचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com