इंग्रजीचा शिक्षक नसल्याने 22 विद्यार्थी नापास; कॅसेटच्या आधारे अध्यापन

विजयसिंग गिरासे
बुधवार, 31 मे 2017

ध्वनिचित्रफितीद्वारे शिक्षण 
महाविद्यालयात इंग्रजी विषयासाठी कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांसाठी एक महिना शिंदखेडा (जि. धुळे) येथून शिक्षक मागविण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफितीद्वारेच इंग्रजी विषयाचे शिक्षण देण्यात आले.

चिमठाणे - येथील चिमठाणे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेत 36 पैकी फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उर्वरित सर्व 22 विद्यार्थी इंग्रजी विषयातच अनुत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयात इंग्रजीचा विषयासाठी शिक्षकच नसल्याने ही स्थिती ओढवल्याचा आरोप करत पालक व विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत एकूण 36 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. इंग्रजीचे विषय शिक्षक प्रा. एम. व्ही. पाटील 31 मे 2016 ला निवृत्त झाल्यानंतर या विषयासाठी शिक्षकाची वर्षभर भरतीच करण्यात आली नाही. विषय शिक्षक नसल्याने इंग्रजी विषयात फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

ध्वनिचित्रफितीद्वारे शिक्षण 
महाविद्यालयात इंग्रजी विषयासाठी कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांसाठी एक महिना शिंदखेडा (जि. धुळे) येथून शिक्षक मागविण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफितीद्वारेच इंग्रजी विषयाचे शिक्षण देण्यात आले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. महाविद्यालयातील 36 पैकी केवळ 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अन्य 22 विद्यार्थी इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल संतप्त पालकांतून उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असलेल्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही संतप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
एसएमएसद्वारे जोडा पॅन आणि आधार: प्राप्तिकर विभाग
औरंगाबादमध्ये समृद्धी मार्गाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर
बुलडाणा: पोलिसाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

योगी आदित्यनाथ अयोध्येत; 'जय श्रीराम'च्या घोषणा
काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
 

Web Title: Dhule news 22 students failed for not being English teacher