विधवा नीताचा चार वर्षांच्या लेकीसह त्यांनी केला स्वीकार...

जगन्नाथ पाटील
शनिवार, 22 जुलै 2017

कापडणे (जि. धुळे) : कापडणे (ता. धुळे) येथील प्रथम वर धनंजय शरदचंद्र उपासणी यांनी झाडी (ता. अमळनेर) येथील नीता सुरेश जोशी या विधवेचा चार वर्षीय मुलीसह स्वीकार केला आहे. विशेष म्हणजे धनंजयच्या मित्रांनी पाचशे लोकांना भोजनावळही दिली. आज (शनिवार) उपासनी कुटुंबाचा भव्य सत्कार एका समारंभ झाला. सनातन ब्राम्हण कुटुंबातही काळानुसार विविध बदल घडत चालले आहेत. समाजातील काहींचा पुढाकारही प्रशंसनीय ठरत आहे.

येथील संत सावता ग्रामीण सहकारी पतसंस्थेने संत सावता महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधत एक दिमाखदार कार्यक्रम घेतला. यावेळी नव दाम्पत्यासह उपासनी व जोशी कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच भटू पाटील, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. चव्हाण, संजय माळी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, साहित्यिक रामदास वाघ, रतन माळी, रवींद्र वाणी, संजय पाटील, प्राचार्य आर. ए. पाटील आदी उपस्थित होते.

झाडी येथील सुरेश माधवराव जोशी यांची लेक नीता चार वर्षांपूर्वी विधवा झाली. एका मुलीसह जगणे सुरु होते. कापडणे येथील सामाजिक कार्यकर्ते व अविवाहीत धनंजय उपासणी यांच्या कानावर ही माहिती आली. त्यांनी नीताशी विवाह करण्याचा निर्धार केला. दोघांच्या आईवडिलांनी होकार दिला. यांचा नुकताच साध्या पध्दतीने विवाह झाला.

मित्रांनीच दिली भोजनावळ
आनंद माळी, गोपाल माळी, भरत पाटील, राहूल पाटील, संजय माळी आदी मित्रांनी स्वखर्चाने भोजनावळ दिली. या भोजनावळीने दोन्ही कुटुंबांकडील नातेवाईकही भारावून गेलेत. सोमेश्वर देवस्थानावर हा विवाह झाला.

दरम्यान, येथील व प्राच्यविद्यापंडीत (कै.) कॉ. शरद पाटलांच्या गावातील हा चौथा विवाह आहे. याआधी दोन विधवा व एका परीतक्ता महिलेचा विवाह येथील तरुणांबरोबर झाला आहे. एक आंतरजातीय विवाह झाला आहे. पाटील यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विवाहाला मोठी चालना येथे दिली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: dhule news Widow's re-marriage in kapadane