CCTV In Dhule : धुळे लवकरच सीसीटीव्हीच्या निगराणीत; 6 तीर्थक्षेत्रे ‘क’ वर्ग घोषित

Dhule soon under CCTV surveillance news
Dhule soon under CCTV surveillance newsesakal

CCTV In Dhule : शहरातील दैनंदिन घडमोंडीवर लक्ष ठेवणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही, शेतकऱ्यांना विनाअडथळा विजेसाठी २०० ट्रान्स्फॉर्मर खरेदी, पर्यटनवाढीसाठी सहा तीर्थक्षेत्रे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याला मंजुरीसह जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या बांधण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (Dhule soon under CCTV surveillance news)

जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ५) ऑनलाइन बैठक झाली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, आमदार किशोर दराडे, आमदार काशीराम पावरा, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जानगर आदी उपस्थित होते.

महिन्यात सर्वेक्षण करावे

पालकमंत्री महाजन म्हणाले, की जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे महिन्यात सर्वेक्षण करा, त्या खोल्या निर्लेखित करून नवीन खोल्या बांधण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करावी. शहराला अक्कलपाडा योजनेने पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

विविध विषयांना मंजुरी

धुळे शहरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्हीसाठी दोन कोटी ६९ लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule soon under CCTV surveillance news
Dhule Employment Fair : धुळ्यात 3081 रिक्त पदांसाठी मुलाखती; या संकेतस्थळावर करा नोंदणी

शिरपूर तालुक्यातील अमोदे येथील श्री गजानन महाराज मंदिर, सावळदे येथील श्री महादेव मंदिर, शिंदखेडा तालुक्यातील दभाषी येथील श्री शनिदेव मंदिर, कर्ले येथील श्री धनदाईमाता मंदिर, सुराय येथील श्री विठ्ठल मंदिर आणि साक्री तालुक्यातील आयने येथील महादेव मंदिर या तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली.

शेतीला विजेसाठी २०० ट्रान्स्फॉर्मर खरेदी लवकर पूर्ण करावी. खरिपात बी-बियाणे व खतांची कमतरता भासू देऊ नये. बोगस बियाणे विक्री प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, अशी सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिली.

निधी वाढवून मिळण्याची मागणी

जिल्हा परिषद अध्यक्षा पवार यांनी जिल्हा परिषद, तर महापौर यांनी महापालिकेस निधी वाढवून मिळावा, अशी मागणी केली. आमदार दराडे यांनी वर्गखोल्यांचा प्रश्न मांडला. आमदार पाटील यांनी ट्रान्स्फॉर्मर खरेदी, आमदार गावित यांनी कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतींसाठी कार्यालये बांधणे, आमदार पावरा यांनी कार्यक्षेत्रात बंधारे दुरुस्ती, रस्त्यांचा प्रश्न मांडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी विहित कालावधीत मंजूर कामे पूर्ण करणे व निधी खर्चाचे नियोजन केल्याचे सांगितले.

Dhule soon under CCTV surveillance news
Nandurbar Rain Update : जिल्ह्याच्या काही भागास पावसाने झोडपले; शेतकऱ्यांमध्ये समाधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com