Dhule News : धुळे-नंदुरबार 50 टक्के सिंचनाखाली आणू : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Dhule : जळगाव ते धुळे असा हेलिकॉप्टरने प्रवास करीत असताना धुळे जिल्ह्यातील प्रवाही तापी नदी बघितली.
While felicitating Nitin Gadkari with a Khandeshi hat at the campaign meeting of Mahayuti, Dr. Subhash Bhamre, Jayakumar Rawal. Neighbor Chandrasekhar Bawankule.
While felicitating Nitin Gadkari with a Khandeshi hat at the campaign meeting of Mahayuti, Dr. Subhash Bhamre, Jayakumar Rawal. Neighbor Chandrasekhar Bawankule.esakal

Dhule News : जळगाव ते धुळे असा हेलिकॉप्टरने प्रवास करीत असताना धुळे जिल्ह्यातील प्रवाही तापी नदी बघितली. तिचे पाणी परिसरातील शेती क्षेत्रात पूर्ण क्षमतेने दिले जावे यासाठीची कामे आणि धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात ५० टक्के सिंचन होईल, अशी महत्त्वाकांशी योजना आणणार असून, आगामी काळात तिची अंमलबजावणी केली जाईल. याकामी पाठपुराव्यासाठी भाजप-महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ( Dhule Nandurbar will be brought under 50 percent irrigation )

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथे शुक्रवारी (ता. १७) दुपारी सभा झाली. श्री. गडकरी म्हणाले, की संकल्पित महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत विविध तलाव आणि नद्यांच्या खोलीकरणासोबत अन्य कामांचा समावेश असेल. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांतर्गत कोट्यवधी रुपये खर्चाची कामे होणार आहेत.

डॉ. भामरे यांचे श्रेय

पंतप्रधान सिंचन योजना, बळीराजा योजनेतून धुळे व शिंदखेडा तालुक्यातील दोनशे गावे सुजलाम सुफलाम होण्यासाठी अडीच हजार कोटींचा निधी सुलवाडे- जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी दिला. ही योजना ७० टक्के पूर्ण झाल्याचे समाधान आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली सिंचन योजनेचे श्रेय डॉ. भामरे यांच्याकडे जाते.

याकामी त्यांनी माझ्याकडे २५ वेळा हेलपाटे मारले. निवेदन दिले. त्यांना पंतप्रधान आणि सचिवांची भेट घ्यावी, असे सुचविले. नंतर तसे त्यांचे पत्र मिळाल्यावर सुलवाडे-जामफळ या योजनेला मंजुरी मिळाले, असे श्री. गडकरी यांनी सांगितले. (latest marathi news)

While felicitating Nitin Gadkari with a Khandeshi hat at the campaign meeting of Mahayuti, Dr. Subhash Bhamre, Jayakumar Rawal. Neighbor Chandrasekhar Bawankule.
Dhule News : जिल्हा बँकेतर्फे 263 कोटींचे खरीप पीककर्ज! धुळे- नंदुरबारच्या 22 हजारांवर सभासद शेतकऱ्यांना लाभ

रेल्वेमार्ग पूर्ण होणार

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत धुळे जिल्ह्यातील बोरविहीर-नरडाणा या ५६ किलोमीटरसाठी ७६० कोटींचा निधी मंजूर आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गही पूर्ण होणार असल्याने कुणी काळजी करू नये. याकामी खासदार डॉ. भामरे यांनी अथक पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे या मार्गाला मंजुरी मिळाली आहे, असेही श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीच्या प्रश्‍नावरही आचारसंहिता संपताच तोडगा काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

रावल यांची प्रशंसा

श्री. बावनकुळे म्हणाले, की कर्तबगार आमदारांचे पक्षात सर्वेक्षण झाले तेव्हा जयकुमार रावल यांचा टॉप टेन आमदारांमध्ये समावेश झाला. आपले पुढचे भविष्य जयकुमार रावल आहेत, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. आमदार रावल म्हणाले, की सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना महाविकास आघाडी सरकार असताना तीन वर्षे बंद होती. त्याचे उत्तर महाविकास आघाडीला द्यावे लागणार आहे.

बुराई नदीवर ३४ बंधारे बांधले. प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना चार वर्षांत पूर्ण होणार आहे. दोंडाईचा व शिंदखेडा येथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला. ८५ गावे ग्रिड योजना लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळी अनुदानापोटी ८६ कोटींचा निधी भाजप शासनाने दिला आहे. सोनगीर-दोंडाईचा रस्त्यासाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद झाल्याचे आमदार रावल यांनी सांगितले.

While felicitating Nitin Gadkari with a Khandeshi hat at the campaign meeting of Mahayuti, Dr. Subhash Bhamre, Jayakumar Rawal. Neighbor Chandrasekhar Bawankule.
Dhule News : बालपिढीला संगणक, मोबाईल ‘गेम्स’चा लळा; मैदानी खेळांकडे पाठ फिरविल्याने आरोग्यावर परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com