Dhule News : जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा; गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश

Dhule News : जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा; गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश
esakal

Dhule News : पिंपळनेर गावात गावठाण व गायरान जमिनीवर गेल्या ५० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. (Evict encroachment on land order by Group Development Officer dhule news)

हे अतिक्रमण निष्कासित करून अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघ, पिंपळनेरचे अध्यक्ष प्रवीण थोरात यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नाशिक विभाग, नाशिक तसेच जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे केली होती. त्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाने विस्ताराधिकारी पंचायत समिती साक्री यांनी १२ एप्रिल २०२३ ला भेट घेऊन चौकशी केली व वरील आदेश दिला.

गायरान जमिनीवरील जमिनीबाबत मे. मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ ला दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश व निर्देश जारी केलेले आहेत, तसेच यापूर्वी मे. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ११ ३२/१२ ११ मध्ये २८ जानेवारी २०११ च्या निर्णयात म्हटले आहे, की गावठाण जागेवरील अतिक्रमणे (काही अपवाद वगळता) निष्कासित करावीत व भविष्यात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule News : जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा; गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश
Nashik News : निवृत्त सभासदांच्या कमी केलेल्या मतदान अधिकार आदेशाला स्थगिती

असा आदेश देऊनही मे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेले नाही. तसेच याबाबत १२ जुलै २०११ ला महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन ०३/२०११/प्र.क्रं./५३/ज१ हा निर्गमित झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. पिंपळनेर ग्रामपंचायत हद्दीत पन्नास वर्षांपासून गायरान व गावठाण जागेवर झालेले अतिक्रमण ग्रामपंचायतीच्या आजी-माजी प्रतिनिधींच्या कार्यकाळात झाले व त्यातून झालेल्या महाघोटाळ्याची चौकशी करावी, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती, साक्री यांनी ३ एप्रिल २०२३ च्या जा.क्र. पंससा/ग्रामपंचायत/१०१६/२०२३ च्या पत्रानुसार ग्रामपंचायत पिंपळनेर गावाच्या गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले.

Dhule News : जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा; गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश
Officers Transfer : सहाय्यक धर्मदाय आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com