Navodaya Vidyalay Entrance Exam : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ; या संकेतस्थळावर करा अर्ज

 admission
admissionesakal

Navodaya Vidyalay Entrance Exam : जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या वर्गासाठी २० जानेवारी २०२४ ला होणाऱ्या निवडचाचणी प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुव्याचे प्राचार्य जी. पी. मस्के यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. (Extension of time for Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam nandurbar news)

परीक्षेसाठी उमेदवार https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज नि:शुल्क भरू शकतात, तसेच www.navodaya.gov.in वरही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे तेथील मुख्याध्यापकांच्या सही-शिक्क्यानिशी संपूर्ण भरलेले व स्कॅन केलेले प्रमाणपत्र विद्यार्थी व पालकांची स्कॅन केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज भरताना अपलोड करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 admission
Nandurbar Marathon Competition : नंदुरबारात 14 ला मॅरेथॉन स्पर्धा; मंत्री डॉ. गावितांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

परीक्षेसाठी विद्यार्थी २०२३-२४ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर आणि नंदुरबार शासकीय/शासन मान्यताप्राप्त शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत असावा.

विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०१२ पूर्वी व ३० जुलै २०१४ नंतर झालेला नसावा. विद्यार्थी तिसरी, चौथी व पाचवी सलग उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवाचे प्राचार्य जी. पी. म्हस्के (दूरध्वनी ०२५७-२५२२६०), परीक्षा प्रभारी व्ही. बी. पाटील (मोबा. ९३५९९४०५४३) यांच्याशी संपर्क साधावा.

 admission
Nandurbar News : बायोडिझेलसदृश इंधनाची खापर परिसरात विक्री; डिझेलपेक्षा 20 ते 25 रुपयांनी स्वस्त

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com