esakal | येवल्याच्या मुक्तिभूमीच्या विकासासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर 
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal0.jpg

दादरची चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्‍टोबर 1935 ला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

येवल्याच्या मुक्तिभूमीच्या विकासासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुक्तिभूमी स्मारकाच्या विकासासाठी 15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीत प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान बांधणे व इतर सुविधा पुरविण्याच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशासकीय मंजुरी दिली. 

सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती

दादरची चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्‍टोबर 1935 ला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. यापूर्वी ऐतिहासिक स्थळांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्याकडून या स्थळाचा विकास करण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीस शासनातर्फे मान्यता दिली. 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

मुक्तिभूमीवर लाखो बौद्धबांधव भेट देतात

यापूर्वी मुक्तिभूमीचा विकास करून या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात आलेले आहे. दर वर्षी मुक्तिभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी लाखो बौद्धबांधव भेट देतात. या स्थळाच्या विकासासाठी भुजबळांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. हे स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षक भिंत, ऍम्फिथिएटर, लॅंडस्केपिंग, अतिथिगृह आदी बाधकामांना प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे अंदाजपत्रके व आराखड्यावर सविस्तर प्रस्ताव सादर केलेला होता. मात्र शासनाकडे गेले अनेक दिवस हा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित राहिला होता.  

हेही वाचा > रात्रीस खेळ चाले! मध्यरात्रीच 'या' ठिकाणी एक हातगाडा लागतो..अन् मग...​

हेही वाचा >शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

loading image