Gopinath Munde Insurance Scheme : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 48 लाख

Gopinath Munde Insurance Scheme
Gopinath Munde Insurance Schemeesakal

Nandurbar News : शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबीयांस आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme 48 lakh funds were distributed to heirs of 24 farmers nandurbar news)

या योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांच्या वारसास ४८ लाख निधी वितरित करण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे.

आता यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ ओळखली जाणार आहे.

सानुग्रह अनुदानास पात्रता

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Gopinath Munde Insurance Scheme
Accident Insurance Scheme : जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांसाठी 36 लाख; सुधारणेसह नवीन नामकरणाने लाभाचे वाटप

जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीजपडून झालेला मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाइटकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना क्र.६ नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अथवा ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील यांचा माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.

संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यापासून तीस दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील. प्रस्तावासाठी कृषी विभागाचे संबंधित गावातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतील.

Gopinath Munde Insurance Scheme
MPSC Exam : या तारखेला महाराष्ट्र गट ब - क संयुक्त पूर्व परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com