Dhule News : सोनगीरमध्ये टेरेसवरील बागेचा पहिला प्रयोग; उपक्रमाचे कौतुक

Principal Smita Bagul inspecting the plants in the garden on the terrace.
Principal Smita Bagul inspecting the plants in the garden on the terrace. esakal

सोनगीर (जि.धुळे) : येथील एका मुख्याध्यापिकेने टेरेसवर आकर्षक बाग (Garden) फुलविण्यात यश मिळविले असून, सोनगीर परिसरातील तिचा हा पहिलाच व एकमेव प्रयोग आहे. विशेष म्हणजे त्यांच्या बागेत सहजपणे उपलब्ध न होणारी सुमारे ४०० रोपे असून, फळे, फुलांसह अनेक औषधी वनस्पती आहेत. (headmistress managed to grow an attractive garden on terrace dhule news)

येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक सहाच्या मुख्याध्यापिका स्मिता बागूल यांनी टेरेसवर बाग फुलविली आहे. इमारतीचा पाचवा मजला व त्यावरील पोटमाळ्यावर एकूण ५०० वर्गफूट जागेत ही बाग व रोपे लावण्यात आली आहेत.

फळांचे पन्नासहून अधिक प्रकार आहेत. त्यात पेरू, चेरी, करवंद, लिंबू, दोन प्रकारची केळी, अंजीर, पपनस, फणस, सहा प्रकारचे आंबे, चार ड्रॅगन फ्रूट, इलायची केळी, संत्री, मोसंबी व अन्य फळांचा समावेश असून, काहींना फळेही लागली आहेत. बागेत मसाल्याची रोपे लावल्याने एक वेगळाच सुगंध दरवळला आहे.

तेजपान, कढीपत्ता, दालचिनी, रोज मेरी, मिक्स मसाला, पुदिना आदींसह विविध प्रकार आहेत. विविध रंग, रूप, आकाराच्या फुलांनी बाग बहरली असून, पाहणारा मंत्रमुग्ध होतो. बागेत ६५ प्रकारचे गुलाब असून, जास्वंद, मोगरा, जाई-जुई, रातराणी, बकुळी, तगर, चमेली, मधुमालती मधुकामिनी, तीन प्रकारची कृष्णकमळे आदी अनेक प्रकार आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Principal Smita Bagul inspecting the plants in the garden on the terrace.
Jalgaon News : मृत्यूनंतरही जग बघणार मुक्ताईनगरचा 10 वर्षीय ओम भारंबे!

याशिवाय कोरफड, फालसा, तोतो, हिरवा चाफा, अक्कल करू, रक्तचंदन, रुद्राक्ष व अनेक औषधी वनस्पतींची गर्दी आहे. लवकरच अजून काही रोपे व उर्वरित जागेत पालेभाज्या आणि लॉन तयार करण्याची योजना आहे. बागेची निगा, पाणी, खाद्य, साफसफाई आदी कामात मुख्याध्यापिका बागूल यांना त्यांचा भाऊ आशुतोष बागूल मदत करतो. काही रोपे स्थानिक, काही नाशिक व काही अन्य ठिकाणांहून मिळविली आहेत.

"विद्यार्थ्यांच्या बालमनाला पर्यावरणाचे महत्त्व सांगताना आपणही वृक्षांशी समरस होऊन दिवसातील काही वेळ त्यांना द्यावा हे विचार घट्ट होत गेले. त्याचाच परिणाम म्हणून ही बाग फुलविली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जाते. खूप समाधान वाटते." -स्मिता बागूल, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा क्रमांक सहा, सोनगीर

Principal Smita Bagul inspecting the plants in the garden on the terrace.
NMC Tax Recovery : गांधीगिरीतून एका दिवसात 11 लाखांची वसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com