medical collage
medical collageesakal

Dhule News : जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; साधनसामग्रीसह डागडुजीसाठी प्रस्ताव मागविला

Dhule News : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांची तत्काळ पाहणी करावी आणि सद्य:स्थितीतील वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. (Inspection of District General Hospital by District Collector dhule news)

त्यानुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शनिवारी (ता. ७) श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करत औषधी, साधनसामग्रीसह रुग्णालयाच्या डागडुजीसाठी प्रस्ताव मागविला.

हिरे मेडिकल व संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात जिल्हाधिकारी गोयल यांच्यासह अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाठक, सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र मिस्त्री, डॉ. अजय सुभेदार, डॉ. इम्रान तेली, डॉ. जीवन पवार, उपअधीक्षक डॉ. प्रकाश सुकळे, अधिसेविका अरुणा भराडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जिल्हाधिकारी गोयल यांनी अतिदक्षता विभाग, सर्जिकल अतिदक्षता विभाग, नवजात शिशू विशेष काळजी कक्ष, अपघात विभाग, रक्तपेढी, प्रसूती कक्ष, मध्यवर्ती औषध भांडार कक्षाला भेट दिली. रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांच्या नातेवाइकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात.

medical collage
Teacher Recruitment : शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

रुग्णालयातील औषधसाठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी. आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचीही आस्थेने चौकशी करावी. दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावे. मध्यवर्ती औषध भांडार कक्षात औषधे तत्काळ उपलब्ध होण्यासाठी नंबरिंग पद्धती अवलंबण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

रिक्त पदांची भरती करा

औषधे, साधनसामुग्री तसेच रुग्णालयाच्या डागडुजीसाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच रुग्णालयातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्यावी. रुग्णालयासह परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात महिन्यातील दोन दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबवावी.

उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, अशी सूचना रुग्णालय व्यवस्थापनास देत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

medical collage
Dhule Recruitment News: कोतवाल, पोलिस पाटील रिक्त पदासाठी भरती सुरु; या संकेतस्थळावर करा अर्ज

प्रसूती कक्षाला भेट

प्रसूती कक्षातील महिलांच्या नातेवाइकांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करीत योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळतात का, याची माहिती घेतली. तसेच रुग्णकक्ष, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पिण्याच्या पाण्याची सोय, पुरेशी औषधे उपलब्ध आहेत किंवा कसे, याची चौकशीअंती खातरजमाही त्यांनी केली.

निधी, औषधसाठ्याची स्थिती

जिल्हा सर्वोपचार रुग्णालयासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत पाच कोटी दहा लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यातून निकषानुसार प्रश्‍न मार्गी लावावेत.

या ठिकाणी ४८६ प्रकारच्या औषधांचा पुरेसासाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणीवेळी दिली. त्यांनी रुग्णालयासह रुग्ण व नातेवाइकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

medical collage
Dhule Recruitment News : जिल्हा रुग्णालयत रिक्त 137 पदांची लवकरच भरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com