Dhule Crime News : दुचाकीवरून गुटखा तस्करी; एलसीबीची तालुक्यात कारवाई

Suspect in custody with Gutkha seized by LCB police team.
Suspect in custody with Gutkha seized by LCB police team. esakal

Dhule Crime News : गुटख्याची दुचाकीवरून (Dhule News) तस्करी करणाऱ्या‍ आर्वी (ता. धुळे) येथील एकाला एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुगंधित गुटखा, तंबाखूसह एक लाख १६ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रविवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई झाली. (Items worth Rs 1 lakh 16 thousand 128 including perfumed gutkha tobacco were seized dhule crime news)

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रतिबंधित गुटखा तस्करांवर कारवाईची सूचना दिली आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास दिनेश बारकू पाटकर (रा. सीताराम चौक, आर्वी, ता. धुळे) हा दुचाकीने (एमएच १८ एबी ६८२९) तंबाखू भरलेल्या गोण्यांसह मेहेरगावकडे येताना दिसला.

त्याला रोखून दुचाकीची झडती घेतली असता त्याच्याजवळील गोण्यांमध्ये सुगंधित पानमसाला व तंबाखूचा साठा आढळला. त्याची किंमत ९६ हजार १२८ आहे. कारवाईत २० हजांराच्या दुचाकीसह एक लाख १६ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. तसेच संशयित दिनेश पाटकर याला अटक केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Suspect in custody with Gutkha seized by LCB police team.
Nashik Crime News : 1 वर्षीय बालिकेचा बेवारस मृतदेह आढळला

पोलिस कर्मचारी पंकज खैरमोडे यांच्या फिर्यादीनुसार सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संतोष हिरे, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, महेश मराठे, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Suspect in custody with Gutkha seized by LCB police team.
Gram Panchayat By Election : जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक; 61 रिक्त जागांसाठी लढत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com