कुसुमाग्रजांच्या जयंतीचा प्रशासनाला विसर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नाशिक - मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांसह महापालिका प्रशासनास कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा विसर पडल्याचे चित्र आज पाहण्यास मिळाले. दुपारनंतर यासंबंधीचे वृत्त प्रसारवाहिन्यांमध्ये झळकताच सर्वजण खडबडून जागे होत जयंती साजरी करण्यात आली. 

कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. यानिमित्त कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी महापालिका प्रशासनातर्फे सजावट करण्यात येते. सकाळी महापौर आणि इतर सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून प्रतिमेस अभिवादन केले जाते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये विविध कार्यक्रम होतात. परंतु, यंदाचे वर्ष काहीसे अपवाद ठरले. मराठी भाषेवरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांसह महापालिका प्रशासनास मात्र कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा विसर पडला. त्यांच्या निवासस्थानी दुपारपर्यंत सजावट, रोषणाई केली नव्हती. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुसुमाग्रजांना अभिवादनही केले नाही. 

दुपारनंतर (ता. 27) याबाबतचे वृत्त सर्व प्रसारमाध्यमांमध्ये येताच महापालिका प्रशासन आणि प्रतिष्ठानला खडबडून जाग आली. भरदुपारी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रोषणाई करण्यात आली. दुपारनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेत्यांसह महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

Web Title: kusumagraj jayanti