Dhule News : प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार डॉक्टरांअभावी ' राम भरोसे '

Mhasadi : Primary Health Centre
Mhasadi : Primary Health Centreesakal

म्हसदी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या महिनाभरापासून रिक्त आहेत. ‘डॉक्टर’च नसल्याने आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांतील ३४ हजार १२३ (२०११ च्या जनगणनेनुसार) ग्रामस्थांचे आरोग्य भगवान भरोसे आहे.

ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. (Lack of doctors in charge of Primary Health Centre Mhasdi Dhule News)

Mhasadi : Primary Health Centre
Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस

१९८९ मध्ये स्थापन झालेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हसदीसह ककाणी, भडगाव, वसमार, राजबाई शेवाळी, चिंचखेडे, अक्कलपाडा, धमनार, सय्यदनगर, इच्छापूर, तामसवाडी, काळगाव, बेहेड, दारखेल, विटाई, निळगव्हाण आदी १६ गावांचा समावेश आहे.

गेल्या महिन्याभरापासून मंजूर असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शिवाय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर, आरोग्यसेविकेचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. म्हसदी आरोग्य केंद्रात म्हसदीसह वसमार, धमनार, बेहेड व विटाई येथे उपकेंद्रे आहेत.

सध्या केवळ धमनार उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) ललित घरटे धमनार, वसमार येथे प्रत्येकी दोन दिवस, तर बेहेड व विटाई येथे प्रत्येकी एक दिवस बाह्यरुग्णांचे काम पाहतात.

Mhasadi : Primary Health Centre
Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

सोळा गावांत अनेक आरोग्य समस्या

सोळा गावांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३४ हजार १२३ असली तरी आज सर्व गावांची लोकसंख्या दुप्पट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील प्राथमिक केंद्र आणि पाच उपकेंद्रांत दररोज रुग्णांची गर्दी असते. सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या सूत्रांनी दिली.

शिवाय ग्रामीण भागात श्वान आणि सर्पदंशाची रुग्ण नेहमीच येत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने विविध साथीचे आजार बळावत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आधारवड असलेल्या गरीब रुग्णांना सध्या खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहेत. सोळा गावांची लोकसंख्या लक्षात घेता म्हसदी आरोग्य केंद्रात तत्काळ दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Mhasadi : Primary Health Centre
Nashik News : आजोबा-वडिलांचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप

आरोग्य केंद्रात अनेक सुविधा

प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात. त्यात प्रसूती, बालकांचे लसीकरण, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, कोविड लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण, श्वान आणि सर्पदंशाची लस आदी सुविधा उपलब्ध असतात. शिवाय अत्यावश्यक सुविधा म्हणून आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाही उपलब्ध असते. हे सर्व असताना वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ‘असून उशीर आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या झाली आहे.

आरोग्य केंद्रांच्या १६ गावांची लोकसंख्या

( लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार)

म्हसदी (७,५२५), ककाणी (२,५३६), भडगाव (४८३), राजबाई शेवाळी (१,२६१), वसमार (१,७०९), चिंचखेडे (१,४३९), अक्कलपाडा (१,३९०), सय्यदनगर (१,१७३), इच्छापूर (२,००३), तामसवाडी (१,३२९), धमनार (५,३६९), काळगाव (१,३०९), बेहेड (२,४३२), दारखेल (७५८), विटाई (२,२१०), निळगव्हाण (१,१९७)

"प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तत्काळ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, अशी मागणी केली आहे. लवकरच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील, असे आश्वासन मिळाले आहे."

-शैलजा देवरे, सरपंच, म्हसदी

Mhasadi : Primary Health Centre
Jalgaon News : भिलवाडात महंत सरजूदास महाराज अटकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com