महापरिनिर्वाण दिन, इज्तिमासाठी विशेष जादा रेल्वेगाड्यांची सोय...'असे' आहे वेळापत्रक 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मनमाड- बडनेरा विशेष साधारण गाडी येत्या शुक्रवारी (ता. 6) मनमाडहून दुपारी पावनेतीनला सुटेल. त्याचदिवशी मध्यरात्री पावणेबाराला विशेष गाडी अमरावतीला पोचेल. नागपूर-मनमाड विशेष साधारण गाडी सोमवारी (ता.9) नागपूरहून सायंकाळी साडेपाचला सोडली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला ही गाडी मनमाडला पोचेल.

नाशिक : मध्य रेल्वेने या आठवड्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि अमरावती येथे तब्लिगी इज्तिमासाठी मुंबई, अमरावतीला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. बडनेरा (अमरावती) येथे तब्लिगी समाजाचा इज्तिमा उत्सव आहे. मनमाड येथून अमरावतीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली आहे.

विशेष रेल्वेगाड्यांची सोय

मनमाड- बडनेरा विशेष साधारण गाडी येत्या शुक्रवारी (ता. 6) मनमाडहून दुपारी पावनेतीनला सुटेल. त्याचदिवशी मध्यरात्री पावणेबाराला विशेष गाडी अमरावतीला पोचेल. नागपूर-मनमाड विशेष साधारण गाडी सोमवारी (ता.9) नागपूरहून सायंकाळी साडेपाचला सोडली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला ही गाडी मनमाडला पोचेल. तिसरी गाडी बल्हारशाह-बडनेरा शुक्रवारी (ता. 6) बल्हारशाह येथून दुपारी दोनला सोडली जाईल. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाला नागपूरला ही गाडी पोचेल. चौथी गाडी बडनेरा- बल्हारशाहदरम्यान सोडली जाईल. ही विशेष गाडी सोमवारी (ता.9) बडनेरा येथून रात्री पावणेबाराला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे चारला बल्हारशाहला पोचेल. 

महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष गाड्या 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरला चैत्यभूमीवर जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी नागपूरहून मुंबईसाठी येत्या बुधवारी (ता.4) रात्री पावणेबाराला विशेष गाडी धावणार आहे. दुसरी विशेष गाडी गुरुवारी (ता.5) नागपूरहून सकाळी सात वाजून 50 मिनिटांनी सुटणार आहे. तिसरी गाडी गुरुवारी (ता. 5) नागपूरहून दुपारी पावणेचारला सुटून मुंबईला दुसऱ्या दिवशी साडेअकराला पोचेल. 

हेही वाचा > काय मनात आले त्याच्या..की सप्तश्रृंगीच्या शीतकड्यावरून उडी घेतली

मुंबई-नागपूरदरम्यान विशेष गाड्या 

01249 डाउन मुंबई-अजनी शुक्रवारी (ता.6) मुंबई दुपारी चारला अजनी शनिवारी सकाळी साडेनऊ 

01251 डाउन मुंबई-सेवाग्राम शुक्रवारी (ता.6) मुंबई सायंकाळी 6.40 सेवाग्राम शनिवारी 10.30 

01253 डाउन दादर-अजनी शनिवारी (ता. 7) दादर मध्यरात्री 12.40 अजनी रविवारी दुपारी चारला 

01255 डाउन मुंबई-नागपूर शनिवारी (ता. 7) मुंबई रात्री 12.35 नागपूर रविवारी 03.30 

01257 डाउन मुंबई-नागपूर रविवारी (ता.8) मुंबई सायंकाळी 18.40 नागपूर सोमवारी 12.10 

01259 डाउन दादर-अजनी रविवारी (ता. 8) दादर रविवारी रात्री साडेबारा अजनीला सोमवारी दुपारी चार 

हेही वाचा > विमाधारकांनो! जुने प्लॅन आता बंद...अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Mahaparinirvan Day, Ijtima Special Extra Train Facilities Nashik Marathi News