Dhule News : क्षयरुग्णांना 6 महिन्यांचा पोषण आहार मोफत; मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मदत

Mangal Grah Seva Sanstha 6 months free nutrition help to tuberculosis patients
Mangal Grah Seva Sanstha 6 months free nutrition help to tuberculosis patientsesakal

Dhule News : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे धुळे शहरातील क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार वाटप करण्यात आला. (Mangal Grah Seva Sanstha 6 months free nutrition help to tuberculosis patients dhule news)

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट्स हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात अमळनेर येथील प्रसिद्ध मंगळग्रह सेवा संस्थेनेही मदतीचा हात पुढे केला.

यात धुळे महापालिका कार्यक्षेत्रातील दहा क्षयरुग्णांना सहा महिन्यांपर्यंत पूरक पोषण आहार (गहू- तीन किलो, शेंगदाणे- अर्धा किलो, गूळ- एक किलो, तेल- एक किलो, तांदूळ- तीन किलो, मठ- एक किलो, मूग- एक किलो) दरमहा पुरवठ्याचे नियोजन केले आहे. या पोषण आहारवाटपाचा कार्यक्रम नुकताच महापालिकेच्या क्षयरोग दुरीकरण केंद्रात झाला.

मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी मनोज तायडे, गोटू रणदिवे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना पोषण आहारवाटप करण्यात आला. या उपक्रमासाठी मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, धुळे महापालिकेचे उपायुक्त विजय सनेर यांचे विशेष सहकार्य लाभले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Mangal Grah Seva Sanstha 6 months free nutrition help to tuberculosis patients
Dhule News : सरकारने मंजूर रस्त्यांप्रश्‍नी स्थगिती उठविली

या वेळी शहर क्षयरोग दुरीकरण केंद्रातील प्रीती कुलकर्णी, शशिकांत कुवर, सुहास वसावे, अनिल बागूल, प्रकाश देवरे, योगेश मोरे, रवींद्र भामरे आदी उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेच्या या मदतीबद्दल महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त सनेर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख आदींनी आभार मानले.

दानशूरांना आवाहन

दरम्यान, या वेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील यांनी २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत अभियानाचे महत्त्व सांगितले. तसेच निक्षय मित्र या उपक्रमात समाजातील विविध घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवून क्षयरुग्णांना सामाजिक आधार द्यावा, क्षयरोग उच्चाटनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. ज्यांना क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मदत करावयाची असेल त्यांनी शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र, कृष्णनगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे येथे (०२५६२-२७८३२२) संपर्क साधावा, असे आवाहन केले.

Mangal Grah Seva Sanstha 6 months free nutrition help to tuberculosis patients
Dhule News : ॲमिनिटी स्पेसला फाटा देत मंजुरीची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com