esakal | शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे धुळ्यात धरणे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे धुळ्यात धरणे आंदोलन 

भाजप सरकारच्या निषेधार्थ व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी हे आंदोलन करीत असल्याचेही काँग्रेस कमिटीने म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे धुळ्यात धरणे आंदोलन 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी (ता. ३) येथील तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार कुणाल पाटील यांनी केले. 

आवश्य वाचा- बियाणे रॉयल्टीबाबतीत महिना अखेरपर्यंत सकारात्मक निर्णय 

शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणाऱ्या नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे का? हे केवळ पंजाबच्या, हरियानाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन नाही, तर देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. शेतकरी म्हणजे काय अतिरेकी आहे का? पोलिसबळाचा वापर का? शेतकरी न्याय मागतोय. तीन विधेयके मंजूर केली. त्याचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता ही विधेयके का लादली? शेतकऱ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही, असे विविध प्रश्‍न काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले.

आवश्य वाचा- आमच्या विजयांमूळे ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू- गिरीश महाजन  

या कृषी कायद्यांच्या अनुषंगाने केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी हे आंदोलन करीत असल्याचेही काँग्रेस कमिटीने म्हटले आहे. या धरणे आंदोलनात धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील, धुळे महापालिकेचे विरोधी पक्षनेते साबीर शेठ, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष बानूबाई शिरसाठ, अशोक सुडके, रावसाहेब पाटील, माजी सभापती बाजीराव पाटील, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, संदीप पाटील, बाजार समितीचे संचालक कीर्तिमंत कौठळकर, चिंचवारचे सरपंच सोमनाथ पाटील, अफसर पठाण, जावेद शहा, हरिभाऊ चौधरी, वसीम बारी, शिवाजी अहिरे, गोपीचंद सूर्यवंशी, प्रवीण माळी, सुदाम देवरे, विवेक जाधव, कापडणेचे माजी सरपंच प्रमोद पाटील, माजी सरपंच भटू पाटील यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image