दोंडाईचा बाजार समितीत...दररोज चार हजार क्विंटल कापसाची खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी "सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, बाजार समितीनेही ऑनलाइन नोंदणी करून रोज चार हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.

चिमठाणे ः दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून "सीसीआय'च्या कापूस खरेदी केंद्रांना आजपासून प्रारंभ झाला. शिंदखेडा तालुक्‍यातील तिन्ही जिनिंग मिळून रोज चार हजार क्विंटल कापूस खरेदी होणार आहे. आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते येथील अभिषेक जिनिंग, त्यानंतर बाह्मणेतील केशरानंद जिनिंग व शेवटी शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंगमध्ये खरेदी केंद्रांना प्रारंभ करण्यात आला.

नक्की वाचा : आमदारकीची संधी पक्षाने आता तरी द्यावी : एकनाथराव खडसे
 

बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, गटनेते अनिल वानखेडे, रवी उपाध्ये, रमेश टाटिया, तहसीलदार सुदाम महाजन, बाजार समितीचे सचिव पंडित पाटील, अरुण सोनवणे, उपसभापती नारायनसिंग गिरासे, जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, डी. एस. गिरासे, माजी सभापती सुरेश देसले, विजय पाटील, सीसीआयचे अधिकारी आदित्य वामन, महेश कितुकले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

क्‍लिक कराः धुळ्यात मृतदेहाच्या अदलाबदलीने सारेच चक्रावले 
 

आमदार रावल म्हणाले, तालुक्‍यात गेल्या 6 वर्षांपासून भीषण दुष्काळी स्थिती होती, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने आणि बुराई नदीसह अन्य ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे झाल्याने यंदा कापसासह गहू, मका आदीचे उत्पादन चांगले आले; परंतु सुमारे 50 टक्के कापूस शिल्लक असताना मात्र शासनाने "सीसीआय'चे खरेदी केंद्र बंद केले होते त्यातच "कोरोना'ची महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी "सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, बाजार समितीनेही ऑनलाइन नोंदणी करून रोज चार हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला टोकण पद्धतीने सुटसुटीत व्यवस्था झाला. सभापती नारायण पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीतर्फे केलेल्या व्यवस्थापनबाबत माहिती दिली. डी. एस. गिरासे यांनी सूत्रसंचालन केले. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात 20 संशयितांचे नमुने निगेटिव्ह 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dodaecha Cotton shopping centers were started