esakal | अंत्यसंस्कारावेळी बसला आश्‍चर्यचा धक्का...दुसराच निघाला मृतदेह, धुळे रुग्णालयाचा गोंधळी कारभार !
sakal

बोलून बातमी शोधा

dhule hospital imege

सोनगीर येथील नातेवाइकांनी मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करून ठाकले. मात्र, जापी येथील नातेवाइकांनी अंतिम दर्शनासाठी पाढऱ्या कपड्यात बांधलेल्या रवींद्र ठाकरे यांचा चेहरा उघडला. प्रत्यक्षात तो रवींद्रचा मृतदेह नसल्याचे लक्षात आले आणि शवविच्छेदनगृहात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचेही लक्षात आले. 

अंत्यसंस्कारावेळी बसला आश्‍चर्यचा धक्का...दुसराच निघाला मृतदेह, धुळे रुग्णालयाचा गोंधळी कारभार !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे ः एकीकडे संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'शी विविध यंत्रणांच्या पातळीवरून लढा सुरू असताना समस्या, अडचणी, तक्रारी वैद्यकीय यंत्रणेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. यात शवविच्छेदनगृहात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याने पीडित नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. या प्रकरणी यंत्रणेतील दोषींवर गुन्हा दाखल होण्यासाठी एका गटाच्या पीडित नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात दुपारपासून ठिय्या मांडला होता. 

आर्वजून पहा : जुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत


राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी असलेल्या रवींद्र ठाकरे (वय 35, रा. जापी, ता. धुळे, हल्ली मुक्काम नकाणे रोड, धुळे) यांची गेल्या शुक्रवारी (ता. 1) प्रकृती बिघडली. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्याच दिवशी त्यांना दुपारी चारला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला; परंतु "कोरोना'ची तपासणी केल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जाईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या परिवाराला सांगितले.

दरम्यान, दोन मेस दुपारी जिल्हा रुग्णालयात आणखी एक अनोळखी मृतदेह दाखल झाला. काही वेळाने अनोळखी मृतदेह असलेल्याचे सोनगीर (ता. धुळे) येथील नातेवाईक त्या ठिकाणी आले. या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेने ठाकरे आणि सोनगीर येथील व्यक्तीचा मृतदेह साक्री रोडवरील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात पाठविला. ठाकरेंचा मृतदेह 48 तास, तर सोनगीरचा मृतदेह 24 तास "कोरोना' चाचणीसाठी पडून होता. 


शवविच्छेदन झाल्यानानंतर दोन्हीही मृतदेह स्वतंत्रपणे पांढऱ्या कापडात ठेवण्यात आले. त्यांचे चेहरेही झाकलेले होते. यानंतर तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने ठाकरे यांच्या व सोनगीर येथील नातेवाइकांना आपल्याशी संबंधित मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. तसेच विविध नमुन्यांतील स्वाक्षरीची प्रक्रिया पार पडली. यानंतर संबंधित नातेवाईक आपापले संबंधित मृतदेह घेऊन सोनगीर व जापीकडे रवाना झाले. सोनगीर येथील नातेवाइकांनी मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करून ठाकले. मात्र, जापी येथील नातेवाइकांनी अंतिम दर्शनासाठी पाढऱ्या कपड्यात बांधलेल्या रवींद्र ठाकरे यांचा चेहरा उघडला. प्रत्यक्षात तो रवींद्रचा मृतदेह नसल्याचे लक्षात आले आणि शवविच्छेदनगृहात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचेही लक्षात आले. 

क्‍लिक कराः विद्यार्थ्यांची घरवापसी चक्क घोड्यावरून

नातेवाइकांनी गाठले रुग्णालय 
नजरचुकीने हाती आलेला सोनगीरचा मृतदेह घेऊन जापीचे पीडित नातेवाईक पुन्हा धुळ्यातील शवविच्छदेनगृहात दुपारी दोननंतर दाखल झाले. त्यांनी वैद्यकीय यंत्रणेकडे रवींद्र ठाकरे यांच्या मृतदेहाची मागणी केली. प्रत्यक्षात चुकीने सोनगीर येथील नातेवाइकांकडे दिला गेलेला मृतदेह रवींद्र यांचा होता व त्यांच्यावर अंत्यसंस्कारही झाले होते. याबाबत कुठलीही माहिती नसल्याने जापीचे पीडित नातेवाईक रवींद्र यांच्या मृतदेहाच्या मागणीसाठी दुपारी तीननंतर शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे आक्रोश करत मृत रवींद्र यांचे भाऊ आणि नातेवाइकांनी आम्हाला न्याय द्यावा आणि वैद्यकीय यंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नव्हती. वैद्यकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत मात्र तीव्र नाराजी व संतप्त उलटसुलट चर्चा सुरू होती. 

नक्की वाचा : सकाळी अंत्यसंस्कार सायंकाळी "पॉझिटिव्ह' ;जळगावात आणखी एक "कोरोना`ने मृत्यू

loading image
go to top