प्रतिबंधित क्षेत्रात जे नियम पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा !

प्रतिबंधित क्षेत्रात जे नियम पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा !

 जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून दोन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (कॅटेन्मेंट झोन) निश्‍चित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व उपाययोजना प्राधान्याने कठोरपणे राबवाव्या. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात जे नागरिक शासनाच्या निर्देशांचे पालन करणार नाही. प्रशासनाला खोटी माहिती देतील, स्वतःची खबरदारी घेण्यात हलगर्जीपणा करतील अशांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. 

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी महापौरांच्या दालनात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, उपयुक्त संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे, डॉ.राधेश्‍याम चौधरी, डॉ.राम रावलानी, डॉ.विकास पाटील, किशोर चौधरी आदी उपस्थित होते. 

विनाकारण फिरणाऱ्यांवर वॉर्ड ऑफिसरने लक्ष ठेवा 
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची 100 टक्के तपासणी करून त्यांना आरोग्य सेतू अँप सक्तीने डाऊनलोड करायला सांगा. तपासणीवेळी माहिती न देणारे, चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवून वॉर्ड ऑफिसरने पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करावी. तपासणी पथक, मनपा अधिकाऱ्यांनी स्वःताची काळजी घ्या. प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्‍यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करा अशा सूचना महापौरांनी बैठकीत दिल्या. 

एक ही संशयीत सुटता कामा नये- आयुक्त 
बैठकीत आयुक्त श्री. कुलकर्णी म्हणाले की, जळगावात कोरोनावर मनपा प्रशासन नक्कीच नियंत्रण मिळवीले, डॉक्‍टरांसह प्रतिष्ठित व्यक्ती लो रिस्कमध्ये असतील तरच त्यांना होम क्वारंटाइन करण्याची परवानगी द्या. वैद्यकीय सेवेसाठी अधिक मनुष्यबळाची आवश्‍यकता असल्यास त्याचे आताच नियोजन करून ठेवा. तसेच सार्वजनिक शौचालये दररोज निर्जंतुक करून प्रतिंबंधित क्षेत्रात एकही संशयीत सुटता कामा नये. सर्व्हेक्षण करताना नगरसेवक, स्थानिक समाजसेवकांची मदत घ्या. थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्‍सीमिटर आणि पीपीई किट तातडीने खरेदी करा. शहरात फिवर क्‍लिनिक सुरू करा, त्याठिकाणी सर्व यंत्रणा उभी करा. आवश्‍यकता भासल्यास आयएमए, रेडक्रॉसची मदत घ्या. रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथी डॉक्‍टरांची मदत घेऊन औषधी वितरित करा, असे आयुक्तांनी सांगितले. 

एक कोटीची निधी तरी दिरंगाई- नगसेवक सोनवणे 
मनपा प्रशासनाला दोन्ही आमदारांनी 50-50 लाख रुपये देवून एक महिना झाला आहे. तरीही आवश्‍यकवैद्यकीय सामुग्री खरेदी केलेली नसल्याची बाबत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी यावेळी समोर आणली. या मुद्द्याला भाजपचे डॉ.राधेश्‍याम चौधरी यांनी देखील दुजोरा देत प्रत्येक प्रभागात बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाऊन परत आलेल्या व्यक्तींची माहिती घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हेक्षण करताना मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, जुना फुफुसांच्या आजाराची तसेच त्या कुटुंबातील नागरिकांच्या व्यवसाय देखील नोंद करण्याची सूचना त्यांनी मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com