जिल्हा सीमा बंद करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. पोलिस, आरटीओ, जिल्हा सीमेवरच संबंधितांची चौकशी करतील. योग्य कारण असेल तरच जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. अन्यथा त्याला परत पाठविले जाईल. 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा सीमा बंद करण्याचे आदेश पोलिस, आरटीओ विभागाला जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज दिले आहेत. मध्यप्रदेशातून रावेरकडे, मुक्ताईनगर तालुक्‍याची सीमा, औरंगाबाद जिल्ह्याची सीमा, धुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठोस कारणाशिवाय नागरिकांना आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. पोलिस, आरटीओ, जिल्हा सीमेवरच संबंधितांची चौकशी करतील. योग्य कारण असेल तरच जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. अन्यथा त्याला परत पाठविले जाईल. 

हेपण पहा -तृतीयपंथीयाचा "तो' खोटा शाप मध्यरात्री महिलांना घेऊन गेला स्मशानभूमीत...

100 वाहने दिली 
शहरासह जिल्ह्यात पोलिस दलाकडे वाहने कमी असल्याने त्यांना गस्त घालण्यास अडचणी येतात. कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पन्नास वाहने जिल्हा पोलिस दलास देवू केले आहे. महापालिका प्रशासनाला जिल्हा प्रशासन वाहने देणार आहे. जेणे करून कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेवढ्या उपाय योजना करतील तेवढ्या अधिक करण्यावर भर असेल. 

नक्‍की वाचा -  "मास्क लावा, तर माल मिळेल'डेअरी चालकाची सजगता 

शिवभोजन केंद्रानी भोजन पॅक करून द्यावीत 
जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांनी जिल्हा रुग्णालयात किंवा गरजूंना शिवभोजनाची थाळी पॅक करून देण्याच्या सूचना केंद्र चालकांना केल्या आहेत. मात्र एका ठिकाणी जेवण देवू नये. भोजन पॅक करून दिले तर संबंधित व्यक्ती स्वतंत्रपणे एकटे जेवण घेईल. अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत. 
 
संचार बंदीच्या सूचना नाहीत 
जळगाव जिल्हयात संचार बंदीबाबत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांना विचारणा केली असता, अजून पर्यंत संचार बंदी बाबत लेखी आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. मला अजून तरी जिल्हयात संचार बंदी लागू करण्याचे आदेश नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district border sill collector order corona virus