निवडक तीन प्रभागातील संपूर्ण "लॉक डाऊन'चा प्रयोग यशस्वी 

निवडक तीन प्रभागातील संपूर्ण "लॉक डाऊन'चा प्रयोग यशस्वी 

धुळे ः दिवसेंदिवस संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'चा धोका वाढत असल्याने आणि चौफेर सीमेलगतच्या कोरोना बाधित क्षेत्राजवळ धुळे शहरासह जिल्हा असल्याने संभाव्य धोक्‍याचा मुकाबला करण्यासाठी आपण किती सज्ज आहोत, मुकाबल्यासाठी नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे तपासण्यासाठी महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासनाने आज (बुधवारी) शहरातील तीन प्रभागात शंभर टक्‍के "लॉक डाऊन' केले. या प्रयोगाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. 


एव्हाना जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अपवाद वगळता या जीवनावश्‍यक वस्तूंचीही गरज भासली नसल्याचे पाहायला मिळाले. कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका, पोलिस व महसूल यंत्रणेने प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवस शहरातील प्रभाग क्रमांक 8, 9 व 10 मध्ये संपूर्ण "लॉक डाऊन'ची घोषणा केली. त्यासाठी तयारीही केली. त्यानुसार आज निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी या तीनही प्रभागातील (जुने धुळे परिसर, मच्छीबाजार, मौलवीगंज परिसर, अकबर चौक, माधवपुरा, तिरंगा चौक, अमर नगर, पारोळा रोड आदी) नागरिकांनी संपूर्ण "लॉक डाऊन'ला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 

20 हजार नागरिकांची तपासणी 
नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंची, वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास अशी मदत उपलब्ध करण्यासाठीही मनपा खास पथके नेमली होती. या पथकांकडे अशा सेवेबाबतही नागरिकांकडून सायंकाळपर्यंत संपर्क झाला नाही. दरम्यान, संपूर्ण "लॉक डाऊन'च्या निमित्ताने या भागातील सर्व नागरिकांचे "नॉन कॉन्टॅक्‍ट इन्फ्रारेड थर्मामीटर'द्वारे तपासणी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी जुने धुळे भागात सरासरी दहा हजार, तर इतर भागात नऊ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात सर्दी, खोकला, ताप असलेल्या रूग्णांची नोंद झाली. या भागात लगोलग फवारणीही करण्यात येत आहे. महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या "लॉक डाऊन'वर नजर ठेवून होते. देशातील असा हा पहिलाच पायलट प्रोजेक्‍ट असल्याचा दावा यंत्रणेने केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com