अधिकाऱ्यांना पाहताच दुकानदाराचे उडाले होश...चक्क ग्राहकांना दुकानात कोंडले ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

दुकाने बंद तरी व्यवसायीक रस्त्यावर काय करतात याचा शंका उपायुक्त वाहूळे यांना आल्यावर दुकानाचे शटर उघडायला लावले असता दुकानात सुमारे तीस ते चाळीस ग्राहक मध्ये अडकलेले अढळून आले.

जळगाव ः जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लॉकडाऊन मधील काही नियम शिथिल करून एकेली दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी शहरात व्यवसायीक मार्केट सुरू केले परंतू नियमाचे उल्लंघन होत असतांना पोलिसांनी मार्केटमधील दुकाने बंद केली होती. आज पून्हा शहरातील व्यापारी संकुलात आज काही कापड व्यावसायिकांचे दुकाने सुरू करून कोणते ही फिजिकल डिस्टिन्सींगचे आदी नियम पाळता व्यवसाय सुरू होते. महापालिकेचे उपायुक्तांना माहिती मिळताच कारवाईसाठी आले असता अनेक दुकानदारांचे होश उडाले. 

क्‍लिक कराः शाळा सुरू होण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम 
 

जळगाव शहर रेड झोन मध्ये असून देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम सोमवारी शिथिल केले होते. त्यानुसार जळगाव शहरातील एकली दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी मोठ्या प्रमाणात दुकाने सुरू झाल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी बाजारातील नियमात बसत नसलेले तसेच व्यापारी संकुलातील दुकाने बंद केली होती. त्यानुसार आज दुपारी फुले मार्केट समोरील काही कापड व्यवसायाचे दुकाने व अन्य दुकाने सुरू असल्याची माहिती प्रभारी उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली. सह्यायक आयुक्त पवन पाटील तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक घेवून ते कारवाईसाठी गेले. फुले मार्केट समोरील काही दुकानदारांना अधिकारी येताना दिसताच त्यांनी पटापट दुकाने बाहेरून शटर लावून बंद करून दुकाने  बंद असल्याचे त्यांनी दाखवीत होते. 

आर्वजून पहा : इथे जगण्याची लढाई "त्यांची' अन आमची... 
 

आणि आली शंका... 
दुकाने बंद तरी व्यवसायीक रस्त्यावर काय करतात याचा शंका उपायुक्त वाहूळे यांना आल्यावर दुकानाचे शटर उघडायला लावले असता दुकानात सुमारे तीस ते चाळीस ग्राहक मध्ये अडकलेले अढळून आले. असे तीन ते चार दुकानांमध्ये परिस्थिती होती. 

दुकाने केली सील.. 
उपायुक्तांनी दुकानदारांना दुकान उघडण्याचे बंदी असतांना देखील दुकान उघडणारे असे तीन कापड व्यवसायाचे दुकाने सील केले. तर बाजारातील काही दुकानात नियम न पाळल्याने तसेच फिजिकल डिस्टिन्सींग व कोरोना संदर्भात दुकानात कोणतेही उपाययोजना केलेल्या नसलेल्या व्यवसायीक यांच्या विरुद्ध कारवाई केली. 

क्‍लिक कराः "लॉकडाउन'मध्ये 35 कोटींत रुतली "एसटी'ची चाके 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation officer Action to seal shops