Women's Day : अरे वा..लग्नसमारंभात महिलांचा असा झाला अनोखा सन्मान ! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

गुजर समाज बांधवांनी गावात समाज बांधवाकडे असलेल्या लग्न समारंभात येणाऱ्या महिला भगिनींचा खास वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्याचे नियोजन केले.

सारंगखेडा: आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने येथील गुजर समाज बांधवाकडून लग्नाला आलेल्या महिलांचा अनोखा सन्मान करण्यात आला. प्रथेनुसार लग्न समारंभात पुरुषांचा प्रथम जेवण्याचा मान असतांना त्याऐवजी महिलांना प्रथम मान देत आदर्श निर्माण केला. आलेल्या पाहुण्यांनीही याला प्रतिसाद देत सहकार्य केले. 

नक्की वाचा :   Women's Day : राजकीय अनुभवाच्या जोरावर भारतीताई महापौर ! 
 

आज ता. मार्च हा जागतिक महिला दिवस त्यानिमित्ताने सर्वत्र महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. त्यालाच अनुसरून येथील गुजर समाज बांधवांनी गावात समाज बांधवाकडे असलेल्या लग्न समारंभात येणाऱ्या महिला भगिनींचा खास वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्याचे नियोजन केले.गुजर समाजाच्या प्रथेनुसार लग्नाच्या सर्व यथोचित विधी संपल्यानंतर अगोदर आलेले सर्व पुरूष व नंतर सर्व महिला अश्‍या दोन पंगतीत भोजन व्यवस्था केली जाते. मात्र समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात शेवटी महिला जेवायला बसल्या की पुरुष वर्ग घरी, शेती किंवा कामा निमित्त बाहेर जाण्यासाठी अति घाई करतात. महिलां जवळ लहान मुले असतात. त्याला जवळ घेऊन जेवतांना अडचणी येत असल्याने बहुसंख्य वेळा त्या अर्धवट उपाशी राहतात. त्यामुळे महिलांना प्रथम मोठ्या कार्यक्रमात बसणे उचित राहील हा विचार सारंगखेडा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे नेहमीच्या प्रथेला ग्रामस्थांनी छेद देत आगोदर महिला व त्यानंतर पुरूषांच्या भोजनाचे नियोजन करीत त्यानुसार पंगती उठविल्या. 

क्‍लिक कराः  Women's Day : आधी वकिली, आता सभापतिपदाचा शुचिताजी सांभाळताहेत यशस्वी धुरा ! 
 

येथील ब्रिजलाल मदन पाटील यांची नात व रविंद्र पाटील यांची सुकन्या मयुरी आणि शहादा (मुळ गाव बोराळा ता.नंदूरबार) येथील अंबालाल छगन पाटील यांचा सुपुत्र अंकुर यांचा विवाह सारंगखेडा येथे पार पडला. या लग्ना प्रसंगी संयोजक व सारंगखेडा ग्रामस्थ यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधित महिलांना प्रथम जेवणांचा मान देत गुजर समाजात एक आदर्श निर्माण केला. या प्रसंगी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, माजी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपाल रावल, दोंडाईचा येथील माजी आमदार बापू साहेब रावल, सरकार साहेब रावल, जिल्हा परिषदेचे सभापती अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. 

आर्वजून पहा :   चिमुकल्या वेदांतने दिली मृत्युशी झंजु...अखेर तो अपयशी ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda wedding ceremony women Dinner first created the model by honoring