Dhule News : धुळ्यात मोबाईल टॉवर सील; महापालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipality team while sealing mobile tower in Dhule Railway Station Road area

Dhule News : धुळ्यात मोबाईल टॉवर सील; महापालिकेची कारवाई

धुळे : महापालिकेने मालमत्ताकर थकबाकीधारकांविरोधात कठोर पावले उचलली असून, जप्ती पथकाने मोबाईल टॉवरधारकावर कारवाई केली. स्टेशन रोडवरील जिल्हा न्यायालयासमोरील एटीसी मोबाईल टॉवर सील करण्यात आले.

भोगवटादार विजय विष्णू दिघे यांच्या जागेवर एटीसी मोबाईल कंपनीचा टॉवर आहे. या मोबाईल टॉवरची तब्बल सहा लाख सात हजार ७५६ रुपये कराची थकबाकी आहे. ती थकबाकी भरण्याबाबत दिघे यांना वारंवार नोटीस बजाविण्यात आली; परंतु तरीही त्यांनी भरणा केला नाही. त्यामुळे अखेर जप्ती पथकाने टॉवर सील केले.

ही कारवाई आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाचे अधीक्षक शिरीष जाधव, अधीक्षक मधुकर निकुंभ, निरीक्षक अजय देवरे, मनोज चिलंदे, संजय माईनकर यांनी केली. (Mobile tower seals Municipal corporation action dhule news)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

पाणीपट्टी व मालमत्ताकर थकविणाऱ्यांवर मनपाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मोहाडी उपनगरातील प्रमिला वामन ठाकूर यांच्या जागेवरील मोबाईल टॉवर सील करण्यात आले होते. त्यांच्याकडे चार लाख ७७ हजारांची थकबाकी होती.

मनपा हद्दीत एकूण १२९ मोबाईल टॉवर असून, पैकी ५९ मोबाईल टॉवरधारकांनी वेळोवेळी मनपाचा कर अदा केला आहे. उर्वरित ७० मोबाईल टॉवरधारकांनी कर थकविल्याने मनपाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतरही कर न भरल्यास टॉवर सील करण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे थकबाकी भरून कारवाईतील कटुता टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

हेही वाचा: Jalgaon Crime News : बीएचआर गैरव्यवहारातील गुन्ह्याच्या तपासाबाबत अनिश्‍चितता