esakal | सत्यजित बच्छाव पाठोपाठ महाराष्ट्र रणजी संघात नाशिकच्या आणखी 'एका' पठ्ठ्याची निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

murtuza trunkwala.jpg

सत्यजित बच्छाव महाराष्ट्र रणजी संघात मुख्य गोलंदाजाची जबाबदारी सांभाळत आहे. उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत मुर्तुझाही महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान बळकट करेल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींकडून व्यक्‍त केली जात आहे. 

सत्यजित बच्छाव पाठोपाठ महाराष्ट्र रणजी संघात नाशिकच्या आणखी 'एका' पठ्ठ्याची निवड 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्यजित बच्छाव पाठोपाठ नाशिकच्या मुर्तुझा ट्रंकवाला याची रणजी क्रिकेट करंडक या मानाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. येत्या मंगळवार(ता. 17)पासून पुण्यातील स्टेडियमवर जम्मू-काश्‍मीरविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुर्तुझाच्या कामगिरीकडे लक्ष असेल. या सामन्यात सत्यजितचाही समावेश असणार आहे. 

फलंदाजीकडे लक्ष, मंगळवारपासून जम्मू-काश्‍मीरविरुद्ध सामना 

यापूर्वी 2017 मध्ये मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघात पहिल्यांदा समावेश झाला होता. त्या वेळी पहिल्याच सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकावले होते. पदार्पणताच शतक झळकवणारा नाशिकचा पहिला खेळाडू होण्याचा बहुमान त्याने मिळविला होता. मुर्तुझाने 23 वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली आहे. गेल्या वर्षी मात्र संघात निवड होईल अशी लक्षवेधक कामगिरी त्याच्याकडून झाली नव्हती. यंदा मात्र रणजी संघाच्या निवड चाचणी सामन्यात मुर्तुझाने जोरदार 233 धावा करताना निवड समितीचे लक्ष वेधले होते. यापूर्वीच सत्यजित बच्छाव महाराष्ट्र रणजी संघात मुख्य गोलंदाजाची जबाबदारी सांभाळत आहे. उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत मुर्तुझाही महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान बळकट करेल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींकडून व्यक्‍त केली जात आहे. 

हेही वाचा > मी लेकरांना घेऊन तीन दिवसांपासून मंदिरात बसलीय..मी तक्रार करणार नाही, फक्त आम्हाला घरात घ्या...

महाराष्ट्र संघाच्या लढती अशा.... 

महाराष्ट्राचा समावेश असलेल्या एलिट गटातील ग्रुप "सी'चे सामने विविध राज्यांच्या संघांसोबत होणार आहेत. यात मंगळवारपासून (ता.17) जम्मू-काश्‍मीर यासह छत्तीसगड (25 डिसेंबर), सेनादल (3 जानेवारी), झारखंड (11 जानेवारी), आसाम (19 जानेवारी), त्रिपुरा (27 जानेवारी), ओडिशा (4 फेब्रुवारी) व उत्तराखंड (12 फेब्रुवारी) यांच्यासोबत लढत होणार आहे.

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..