Dhule News : क्रांतिदिनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार; स्वातंत्र्यसैनिकांची नावे शिलालेखावर कोरली जाणार!

Archived photograph of freedom fighters and then students on the first Independence Day, August 15, 1947.
Archived photograph of freedom fighters and then students on the first Independence Day, August 15, 1947. esakal

Dhule News : जिल्ह्यात ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत स्वातंत्र्यसैनिक यांच्या गृहभेटी घेऊन सत्कार होणार आहे. तर प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, गोवामुक्त आंदोलनातील सेनानी व शहीद जवान यांची नावे शिलालेखावर कोरली जाणार आहे.

ही शिलालेख पंचायतीत किंवा पंचायतीच्या बाहेरील मुख्य भिंतीवर लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. (Names of freedom fighters fighters and martyrs of Goa freedom movement will be engraved on inscription dhule news)

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राबविण्यात येत आहे. हा महोत्सव अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ९ ते १९ ऑगस्टपर्यंत राबविण्याबाबत निर्देश आहेत.

त्याचा एक भाग म्हणून ९ ऑगस्टला स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले स्वातंत्रसैनिक तसेच कारावास भोगावा लागणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देवून व यथोचित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. धुळे तालुक्यात जवळपास ४९ स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारस हयात आहेत. त्यांच्या गृहभेटी घेऊन गुलाबपुष्प देऊन सत्कार होणार आहे.

गाव तिथे शिलालेख

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासह गोवामुक्ती आंदोलनात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक व सैन्यदलात शहीद झालेल्या जवानांची नावे शिलालेखावर कोरली जाणार आहेत. शिलालेख प्रत्येक ग्रामपंचायतीला बनविण्याचे निर्देशित आहेत. त्यासाठी पंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांची नावे संकलनासह शिलालेख बनविण्याच्या कामास वेग दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Archived photograph of freedom fighters and then students on the first Independence Day, August 15, 1947.
Dhule News : जन्म-मृत्यूच्या संघर्षात आईचा पुनर्जन्म; जवाहर मेडिकल रुग्णालयात डॉक्टरांकडून जीवदान

या स्वातंत्र्य सैनिकांची नावे शिलालेखार

विष्णूभाऊ पाटील, शरद पाटील, आनाजी तानाजी पाटील, गुलाबभाई काळू पिंजारी, राजाराम वाका पाटील, पुंडलिक माधवराव पाटील, भिला रावजी पाटील, उत्तम नथा पाटील, एकनाथ सुकलाल पाटील, सहादू बळिराम माळी, काशीनाथ दगडू वाणी, चंद्रभागाबाई निंबा पाटील, धनगर भिका पाटील, यादवराव दिवाण पाटील, शंकर एकोबा पाटील, विश्वास बाजीराव पाटील, बळिराम काशीराम पाटील, हिलाल दौलत पाटील, दामोदर हैबत पाटील, यशवंत देवराम पाटील, वामन भिका पाटील, भटू मोहन पाटील, आत्माराम शंकर पाटील, श्रावण लकडू माळी, नारायण सोमा माळी, पंढरीनाथ शिवराम माळी, माधवराव दिवाण पाटील, दोधू पितांबर सुतार, भावराव नथ्थू पाटील, बाजीराव चिमणा पाटील, गुलाब मोतीराम पाटील, आखा भावसिंग भामरे, भिवसन चंदा भामरे, शंकर भिवा भामरे आदी.

Archived photograph of freedom fighters and then students on the first Independence Day, August 15, 1947.
Dhule News : महापालिकेचा अजब कारभार! अनधिकृत नळधारकांना थेट कारवाई ऐवजी पाणीपट्टी भरण्याची केली जाते विनंती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com