Organ Donation : वडिलांच्या देहदानाचा संकल्प मुलांनी केला पूर्ण

Organ Donation : तळोद्यातील ८७ वर्षीय वल्लभ वेडू सूर्यवंशी यांच्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प रविवारी (ता.१०) त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करत समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला.
Relatives of Vallabh Suryavanshi came to Bhausaheb Hire Government Medical College to hand over the body.
Relatives of Vallabh Suryavanshi came to Bhausaheb Hire Government Medical College to hand over the body.esakal

Nandurbar News : अंत्यसंस्काराचा कोणताही धार्मिक विधी व कर्मकांड न करता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चिकित्सा व संशोधनासाठी तळोद्यातील ८७ वर्षीय वल्लभ वेडू सूर्यवंशी यांच्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प रविवारी (ता.१०) त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करत समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला. (Nandurbar children fulfilled the father resolution of donating organ)

‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ या ओळीं प्रमाणे आपल्या मृत्यूनंतरही आपण उपयोगी पडावे या भावनेतून केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले वल्लभ सूर्यवंशी यांनी तीन वर्षांपूर्वीच देहदानाचा निर्णय घेतला होता. आपल्या हयातीतच देहदानाच्या संकल्प करून कागदपत्रांची पूर्तता केली होती. रविवारी पहाटे त्यांच्या मृत्यूनंतर सकाळी त्यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या संकल्पाची पूर्ती करून देहदानासाठी त्यांच्या देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मानवीय देहाची गरज असते. परंतु देहांच्या कमतरतेमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरते. अशा विद्यार्थ्यांना आपल्या देहाचा उपयोग व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

Relatives of Vallabh Suryavanshi came to Bhausaheb Hire Government Medical College to hand over the body.
Nandurbar News : तुळाजा धरणाच्या कामामुळे पाणी पातळीत वाढ होणार : आमदार राजेश पाडवी

त्यामुळे त्यांनी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे इच्छापत्र भरून दिले होते. महाविद्यालयाने देखील मान्यता देऊन त्यास संमती दिली होती.

रविवारी दिनांक १० रोजी पहाटे पाच वाजता वल्लभ सूर्यवंशी यांनी प्राणत्याग पत्नी शांतीबाई सूर्यवंशी, लहान बंधू प्रा. रमेश सूर्यवंशी, प्रा. मितलकुमार टवाळे, हेमचंद्र टवाळे, अरुण व विलास सूर्यवंशी, रंजना बत्तीसे, कल्पना मगरे, डॉ. कल्याणी टवाळे यांनी त्यांच्या संकल्पनेला साथ देऊन त्यांच्या देह महाविद्यालयाकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे देहदानाच्या संकल्प पूर्ण केल्याबद्दल सूर्यवंशी कुटुंबाचे कौतुक करण्यात येत आहे. या घटनेची पंचक्रोशीत एकच चर्चा होती.

Relatives of Vallabh Suryavanshi came to Bhausaheb Hire Government Medical College to hand over the body.
Nandurbar News : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार ‘स्मार्ट एज्युकेशन’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com