नाशिक: कृष्णगाव शिवारात आई, मुलाचा खून

दिगंबर पाटोळे
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कृष्णगाव शिवारात आेझरखेड धरण गाळपेरा क्षेत्रालगत असलेल्या शेळकेवाडी येथे शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान सविता गोटीराम सहाळे (वय 35) व मुलगा करण गोटीराम सहाळे (वय १०) यांचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत वणी पोलिस ठाण्यात मयत सविता सहाळे हिचा मामा संजय कोंडाजी गांगोडे (रा. शेळकेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.  

वणी (नाशिक) : कृष्णगाव (ता. दिंडोरी) शिवारात अज्ञात मारेकऱ्यांनी आई व मुलाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून वणी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेला प्रकार असा, की कृष्णगाव शिवारात आेझरखेड धरण गाळपेरा क्षेत्रालगत असलेल्या शेळकेवाडी येथे शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान सविता गोटीराम सहाळे (वय 35) व मुलगा करण गोटीराम सहाळे (वय १०) यांचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत वणी पोलिस ठाण्यात मयत सविता सहाळे हिचा मामा संजय कोंडाजी गांगोडे (रा. शेळकेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.  

सविता सहाळे या आपला मुलगा करण यांच्यासमवेत शेळकेवाडी येथे वास्तव्यास होते. दहा वर्षापीर्वीच सविताचे पतीचा मृत्यु झाला असून करण हा आेझरखेड येथे इयत्ता तिसरीत शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान संजय गांगोडे यांची मुलगी सविता यांच्या घराकडे गेली असता. घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यावेळी तीने आत डोकुन पाहीले असता जमिनीवर कोणीतरी पडलेले दिसताच ती घाबरून तिच्या घराकडे आली. तिने हा प्रकार सांगितला. त्यावेळी संजय गांगाेडे व इतर सविता यांच्या घराकडे धावले व प्रकार पाहीला घराचे दार अर्धवट उघडे होते. सविता ही जमिनीवर पडलेली होती. ति पायाजवळ रक्त तसेच चेहरा विद्रुप केलेला होता. तसेच काही अंतरावर तीचा मुलगा करण पडलेला होता. त्याच्या गळयातुन रक्त येत होते. याबाबत वणी पोलिस ठाण्यात घटनेची माहीती दिली असता पोलिस ठाण्याचे पो.नि अनंत तारगे सहा पो.निरी दिवे, पो.उप निरि. नितीन पाटील व पोलिस कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली व पंचनामा केला.

दरम्यान दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक पाठविण्यात आले असून या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे. दरम्यान पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचरण करुन अज्ञात मारेकऱ्याचा माघ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Nashik news double murder in krushnagaon