esakal | नाशिकमध्ये रेल्वे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; तब्बल ९० कर्मचाऱ्यांना लागण

बोलून बातमी शोधा

 90 railway employees in Nashik found corona positiv Marathi News

घोटी ते मनमाड स्टेशन दरम्यान रेल्वेच्या ९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मनमाड, निफाड, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, लहवित, घोटी रेल्वे स्टेशनवर विशेष करून कोरोनाची लागण झाली आहे. त्यात नाशिक रोडचे कर्मचारीही जास्त आहेत. 

नाशिकमध्ये रेल्वे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; तब्बल ९० कर्मचाऱ्यांना लागण
sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : घोटी ते मनमाड स्टेशन दरम्यान रेल्वेच्या ९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मनमाड, निफाड, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, लहवित, घोटी रेल्वे स्टेशनवर विशेष करून कोरोनाची लागण झाली आहे. त्यात नाशिक रोडचे कर्मचारीही जास्त आहेत. 

भुसावळ विभागात येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी चार हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. 
नाशिक रोड येथील रेल्वे अधिकारी कुंदन महापात्रा व स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांनी सांगितले, नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये १६ ते १८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ते घरी उपचार घेत आहे. अनेक लोक सरकारी दवाखान्यात उपचार घेत असून, अनेकांनी गृह विलगीकरण पसंत केले आहे. विशेष करून कमर्शिअल क्षेत्रात काम करणारे रेल्वेचे कर्मचारी यांना कोरोणा ची लागण झाली आहे . 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 


रेल्वेच्या कमर्शिअल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये लोकसंपर्क असणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहे. यासाठी रेल्वे स्थानकावर अनेक निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत- 
- कुंदन महापात्रा, रेल्वे अधिकारी. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन