esakal | दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज! नाशिकमध्ये 'असे' असेल नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

नाशिक : दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : श्री गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi Festival 2021) निमित्त शुक्रवारी (ता.१०) घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र, परंपरेनुसार शनिवारी (ता.११) दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार असून, महापालिका प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी आणि नियोजन केले आहे.

हेही वाचा: बाप्पाची आरती अन् नमाज अजान! दोन्ही योग एकाच दिवशी

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

शहरात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, यंदा दहा दिवसांनी गणरायाचे विसर्जन होणार आहे. मात्र, परंपरेनुसार काही नागरिक दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने योग्य नियोजन केले असून, आवश्यक ती खबरदारी घेतली असल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी दिली. विसर्जनासाठी गोदाघाट परिसरात रामकुंड, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, टाळकुटेश्वर, तपोवनात कपिला संगम, नांदूर घाट, म्हसरूळ येथील सीता सरोवर ही नैसर्गिक ठिकाणे निवडण्यात आली आहेत. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने स्लॉट बुक केले असून, त्यानुसार तपासणी करून विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विसर्जनस्थळी प्रत्येकी चार ते पाच मनपा कर्मचारी असणार आहेत. हे कर्मचारी गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन करतील आणि मनपाच्या बांधकाम विभागामार्फत गणेशमूर्ती दान स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. नदी प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा, हा यामागचा उद्देश असल्याचे दराडे यांनी सांगितले. तसेच, दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काही नागरिकांनी कृत्रिम तलाव तयार केले असून, घरच्या घरीच विसर्जन केले जाणार आहे. दरम्यान, गोदाघाट परिसरात पंचवटी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली.

हेही वाचा: CoWIN चे नवीन फिचर! लसीकरण झाले की नाही समजणार

हेही वाचा: बाप्पाची आरती अन् नमाज अजान! दोन्ही योग एकाच दिवशी

loading image
go to top