Nashik Amit Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे नाशिकच्या मैदानात; मंडळांना भेट देत घेणार गणरायचे दर्शन

Amit Thackeray on visit to Nashik today nashik news
Amit Thackeray on visit to Nashik today nashik news

Nashik Amit Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा नाशिक बालेकिल्ला बनविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी युवा नेते अमित ठाकरे मंगळवारी (ता.२६) नाशिक दौऱ्यावर येत असून यात नाशिक लोकसभा मतदार संघातील ३५ गणेश मंडळांना भेटी देऊन आरती करणार आहे.

पुढील वर्षी एप्रिल व मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहे. निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेने पुन्हा मान ठोकण्याची तयारी केली आहे. त्यासाठी युवा नेते अमित ठाकरे सातत्याने नाशिकचा दौरा करत आहे. (Amit Thackeray on visit to Nashik today nashik news)

मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यात महा संपर्क अभियान त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले. या अभियानामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याबरोबरच काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. आता २६ व २७ सप्टेंबरला ते नाशिकमध्ये येणार आहे.

या कालावधीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक शहरातील चारही मतदारसंघ व सिन्नर तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना ते भेटी देणार आहे. काही ठिकाणी आरती करतील तर काही ठिकाणी देवदर्शन करून पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील.

नाशिक रोड, इंदिरानगर, अंबडगाव, सिडको, गंगापूर रोड या भागातील १६ गणेश मंडळांना ते भेट देतील. बुधवारी सिन्नर, सातपूर, मखमलाबाद, देवळाली, भगूर, पळसे या भागातील १९ गणेश मंडळांना भेटी देतील. अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. याच माध्यमातून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.

Amit Thackeray on visit to Nashik today nashik news
Amit Thackeray: "निवडणुकीवेळी लपून बसता अन् स्थगितीनंतर बिळाबाहेर येता"; अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा

अमित यांच्याकडे नाशिकची जबाबदारी

अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण या भागाकडे स्वतः लक्ष देत आहे. नाशिकमध्ये अमित ठाकरे यांनी संघटना बांधणी बरोबरच शहरातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेऊन संपर्क वाढवत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यापक भूमिका स्पष्ट झालेली नाही

मागील निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी सरकार विरोधात प्रचार केला होता. ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा त्यांचा डायलॉग त्यावेळी गाजला. आता राज्यात मनसेचे उमेदवार उभे राहिल्यास त्याचा फटका नेमका शिवसेनेला बसतो की भाजपला हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Amit Thackeray on visit to Nashik today nashik news
Raj Thackeray: गणपतीची आरास म्हणून साकारला राज ठाकरेंच्या सभेचा देखावा !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com